Tarun Bharat

ग्राम पंचायतीसाठी 10 ऑगस्टला मतदान

मुदतवाढीची याचिका फेटाळल्याने निर्णय : 12 रोजी मतदान, 40 दिवसांचा कालावधी : आयोगाकडून अधिसूचना जारी

प्रतिनिधी / पणजी

राज्य सरकारची पंचायत निवडणुकीसाठी मुदतवाढीची मागणी याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने गोव्यातील 186 पंचायतींसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान घेण्याचे जाहीर केले आहे. 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या मुदतीत पंचायत निवडणूक घेण्याचे आयोगाने निश्चित केले आहे. त्यामुळे गेले दोन महिने चालू असलेला पंचायत निवडणुकीचा घोळ आता संपुष्टात आला असून 10 ऑगस्ट रोजी म्हणजे पावसाळ्य़ातच निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंचायत निवडणुकीसाठी एकंदरित 40 दिवस मिळणार असून त्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, सरकारशी कोणतीही सल्लामसलत न करता आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सरकारला 10 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

सरकारचा डाव उधळला

यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तसेच जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ात राज्य निवडणूक आयोगाने सरकारला अनेक तारखा सुचवल्या होत्या परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आणि पावसाचे निमित्त करुन पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी पंचायतीवर प्रशासकही नेमले. परंतु न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करुन सरकारचा हा डाव उधळून लावला आहे. आयोगाने देखील आता पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर करताना राज्य सरकारला विश्वासात घेतलेले नाही.

अधिवेशन काळातच निवडणूक

आयोगातर्फे अधिसूचना रात्री उशिरा जारी करण्यात आला. मात्र एकंदर निवडणुकीचा कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया चालू असतानाच आता विधानसभा अधिवेशनही होणार आहे. अजून तरी अधिवेशनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. आता अधिवेशन काळातच मतदान होणार असून शेवटच्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला मतमोजणी करण्यात येणार आहे.

Related Stories

कला मंदिरच्या ऐतिहासिक नाटय़स्पर्धेचा पडदा उघडला

Amit Kulkarni

कळंगूट येथे नायजेरियनकडून पाच लाखांचे कोकेन जप्त

Amit Kulkarni

पेडणे रेल्वे स्टेशनवर परप्रांतीय एकत्र आल्याने गोंधळ

Patil_p

जीएसटीपोटी 750 कोटी परताव्याची केंद्राकडे मागणी

Omkar B

काजू बागायतदार सापडले संकटात

Omkar B

गोवा डेअरीच्या आर्थिक स्थितीबाबत दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवू नका

Patil_p
error: Content is protected !!