Tarun Bharat

पोटनिवडणुकांसाठी सहा राज्यात मतदान

येत्या रविवारी होणार मतमोजणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगणा या सहा राज्यांमधील एकंदर विधानसभेच्या 7 जागांवर गुरुवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या सर्व जागांसाठी 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिह्यातील गोला विधानसभेच्या जागेवरही पोटनिवडणूक पार पडली असून तेथे शेतकऱयांच्या हत्येवरून बराच गदारोळ झाला होता. येथे सात उमेदवार रिंगणात आहेत. त्याचबरोबर तेलंगणात यावेळी भाजप पूर्ण मेहनतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. ही पोटनिवडणूक भाजपसाठी आशादायी आहे.

हरियाणातील हिसार जिह्यातील आदमपूर मतदारसंघात भाजपच्या भव्य बिश्नोई आणि काँग्रेसचे जयप्रकाश यांच्यात लढत असल्याचे मानले जात आहे. येथे भाजपमधून बाहेर पडलेले सत्येंद्र सिंह यांना आम आदमी पक्षाने तिकीट दिल्याने निकालाची उत्सुकता सर्वाधिक आहे. तेलंगणातील मुनुगोडे विधानसभा जागा तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस, भाजप आणि काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. काँग्रेसचे आमदार कोमातीरेड्डी राज गोपाल रेड्डी यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. तसेच महाराष्ट्रात मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठीही पोटनिवडणूक पार पडली. त्याचबरोबर ओडिशातील धामनगर मतदारसंघातही पोटनिवडणूक झाली.

बिहारमध्ये दोन जागा

बिहारमधील मोकामा जागा जिंकण्यासाठी भाजपने कोणतीही कसर सोडलेली नाही. त्याचवेळी सत्ताधारी महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदने ही जागा पुन्हा आपल्या खात्यात जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने सोनम देवी यांना उमेदवारी दिली आहे, तर आरजेडीने नीलम देवी यांना तिकीट दिले आहे. नीलम यांच्या उमेदवारीला सात पक्षांच्या महाआघाडीचा पाठिंबा आहे. बिहारमधील प्रसिद्ध गोपालगंज जागेवरही पोटनिवडणूक होत आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारसाठी ही पहिलीच निवडणूक आहे. भाजप आमदार सुभाष सिंह यांच्या निधनामुळे गोपालगंजची जागा रिक्त झाली आहे. या जागेवरून भाजपने त्यांच्या पत्नी कुसुम देवी यांना तिकीट दिले आहे. त्याचवेळी राजदने मोहन प्रसाद गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.

Related Stories

ऑक्सिजनवर आधारित रूग्णांनाच ‘रेमडेसिवीर’

datta jadhav

महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी दिशानिर्देश

Patil_p

मिशन पंजाब : अरविंद केजरीवाल यांनी केल्या ‘या’ तीन घोषणा

Tousif Mujawar

भारतात मागील 24 तासात 28,637 नवे कोरोना रुग्ण, 551 मृत्यू

datta jadhav

कायदामंत्र्यांनाच ट्विटरचा दणका

Amit Kulkarni

एअर इंडियाचे टाटांकडे अधिकृत हस्तांतरण

Amit Kulkarni