Tarun Bharat

उपराष्ट्रपती निवडणुकीचे आज मतदान-निकाल

Advertisements

देशाला मिळणार 14 वे उपराष्ट्रपती ः धगखड यांचे पारडे जड

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशाचे 14 वे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी शनिवारी मतदान होणार आहे. या पदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यातील निवडणूक ही केवळ औपचारिकता असणार आहे. मतदानापासून दूर राहण्याची तृणमूल काँग्रेसची घोषणा, शिवसेनेत फूट आणि एनडीएचे उमेदवार धनखड यांना पाठिंबा जाहीर करणाऱया चार विरोधी पक्षांनी ही लढत एकतर्फी केली आहे.

संसद भवनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू होणार आहे. त्यानंतर रात्रीच निकाल जाहीर होतील. सर्वसाधारणपणे या निवडणुकीत धनखड यांना स्वबळावर निवडणूक जिंकता यावी अशी रालोआची स्थिती आहे. सत्ताधारी गटाचे लोकसभेत 303 आणि राज्यसभेत 91 सदस्य आहेत. ही संख्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 790 सदस्य हे उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजचा भाग आहेत. यामध्ये राज्यसभेतील 233 निवडून आलेले सदस्य आणि 12 नामनिर्देशित सदस्य असतील. तसेच लोकसभेतील 543 निवडून आलेले सदस्य आणि 2 नामनिर्देशित सदस्य मताधिकार बजावतील. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला मतदान प्रक्रियेत 395 पेक्षा जास्त मते मिळवावी लागतील.

विरोधकांच्या पाठिंब्यामुळे जनखड यांचा विजय सुकर

राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणेच उपराष्ट्रपती निवडणुकीत बीजेडी, वायएसआर काँग्रेस, बसपा आणि टीडीपीने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. या पक्षांचे दोन्ही सभागृहात 67 सदस्य आहेत. याशिवाय शिवसेनेचे किमान 13 सदस्य लोकसभेत भाजपसोबत आहेत. त्यानुसार या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला 65 टक्क्मयांहून अधिक मते मिळतील, अशी आकडेवारी सध्या मांडली जात आहे.

तृणमूल काँग्रेसचा विरोधकांना दणका

या निवडणुकीत विरोधी गटाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्या विजयाची शक्मयता नसली तरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर या निवडणुकीत विरोधकांना एकजूट दाखवण्याची संधी होती. मात्र, टीएमसीने मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केल्यानंतर एकता दाखवण्याच्या आशा मावळल्या होत्या. काँग्रेसने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत टीएमसीने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला होता.

भाजपची रणनीती कामी

राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजपची रणनीती कामी आली. धनखड यांच्या नावावर एनडीएला एकसंध ठेवण्यात पक्षाला यश येण्याबरोबरच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ज्या पक्षांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिलेल्या पक्षांचा पाठिंबाही मिळवण्यात भाजप सफल ठरला आहे.

भाजप खासदारांना मतदानाचे प्रशिक्षण

उपराष्ट्रपती निवडणुकीवेळी मते बाद होऊ नयेत यासाठी भाजपने आपल्या पक्षाच्या खासदारांना मतदानाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. संसदेच्या बालयोगी सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे होते. बैठकीत खासदारांना मतदान कसे करायचे हे समजावून सांगण्यात आले.

Related Stories

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ स्पष्टीकरणावर प्रियांका गांधी म्हणाल्या, माजरा क्या है?

Abhijeet Shinde

उत्तराखंड : मागील 24 तासात 449 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

शेतात जाण्यासाठी हवं हेलिकॉप्टर…

Patil_p

बायजूस-अमेरिकन किड्स कोडिंग प्लॅटफॉर्ममध्ये व्यवहार

Patil_p

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; खत दरवाढ अखेर मागे

Abhijeet Shinde

हुर्रियतच्या दोन्ही गटांवर बंदीची तयारी

Patil_p
error: Content is protected !!