Tarun Bharat

व्यावाहारातील चिकाटी व सामाजिक बांधिलकीमुळे व्हीपीके प्रगतीपथावर

सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांचे प्रतिपादन : व्हीपीके अर्बन 29 व्या वर्धापनदिनात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वार्ताहर /म्हार्दोळ

व्यावहारातील चिकाटी व समाजबांधिलकी हे महत्त्वाचे गुण व्हीपीकेच्या प्रगतीमागील खरे गमक आहे. व्हीपीके संस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून या संस्थेने सामाजिक बांधिकलकी जपून विद्यार्थ्यांना नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार क्षेत्र वृद्धिगत होणे अंत्यत गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष शिरोडक यांनी केले.

  म्हार्दोळ येथील वेलींग प्रियोळ कुंकळय़े पंचायतीच्या सभागृहात गुरूवारी आयोजित  करण्यात आलेल्य़्या सहकार क्षेत्रातील अग्रणी व्हीपीके अर्बन कॉ ऑप क्रेडीट सोसायटीच्या 29 व्या वर्धापनदिन सोहळय़ात ते प्रमुख पाहणे म्हणून बोलत होते. यावेळी फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, माजी सहकार मंत्री प्रकाश वेळीप,सहकार निबंधक विशांत गावणेकर, व्हीपीके अर्बनचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, उपाध्यक्ष सुर्या गावडे तसेच इतर संचालक व मान्यवर उपस्थित होते.

   यावेळी पुढे बोलताना शिरोडकर म्हणाले की सहकार क्षेत्राच्या वृद्धिवरच राज्याचा विकास अवलंबून असतो. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्र बळकट करण्याची जबाबदारी आज युवा कार्यकर्त्यावर आहेत. व्हीपीके अर्बन पतसंस्थेने राज्याच्या आर्थिक क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांनी व्हीपीकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

   माजी सहकार मंत्री प्रकाश वेळीप, नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही विचार मांडले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. दुर्गादास गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्हीपीकेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे यांनी सुत्रसंचालन केले.

Related Stories

भाजप अल्पसंख्याकाचा विरेधात

Omkar B

परराज्यातून येऊन आम्हाला जातीयवादाच्या गोष्टी सांगू नये- डॉ. प्रमोद सावंत

Patil_p

नेत्रचिकित्सा उपक्रमामागे सरकारची दूरदृष्टी

Amit Kulkarni

गोंय… एक जैत कथा! धगधगत्या अंगाराचे महानाटय़

Amit Kulkarni

सापळय़ामध्ये अडकून कोपार्डे येथे बिबटय़ाचा मृत्यू

Amit Kulkarni

कोरोनासंदर्भात पोस्टर लाँच

Amit Kulkarni