Tarun Bharat

व्हीव्हीआयपींना मिळणार आयईडीच्या धोक्यापासुन सुरक्षा

45 कोटी रुपयांचे विशेष जॅमर खरेदी केले जाणार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

अतिमहनीय लोकांना (व्हीव्हीआयपी) आयईडीसारख्या बॉम्बस्फोटांच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी सीआरपीएफला विशेष आरसीआयईडी जॅमर दिले जाणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 45 कोटी रुपये खर्चून अशाप्रकारचे 10 जॅमर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. विशेष प्रकारच्या वाहनांवर बसविण्यात आलेले हे जॅमर स्वतःच्या आसपासाच्या शेकडो मीटर भागात रिमोटने संचालित आयईडी बॉम्ब निष्क्रीय करू शकतात. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या सुरक्षेत अशाप्रकारच्या जॅमरचा वापर पूर्वीपासूनच होतोय. आता अतिसंवेदनशील भागांमध्ये प्रमुख व्हीव्हीआयपींच्या दौऱयावेळीही या जॅमरना तैनात केले जाईल.

आयईडीचा वाढता धोका पाहता सीआरपीएफने वाहनावर बसविण्यात येणाऱया रिमोट कंट्रोल इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस जॅमर्स खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता, या प्रस्तावाला गृह मंत्रालयाने अलिकडेच मंजुरी दिली आहे. यातील प्रत्येक आरसीआयईडीची किंमत सुमारे 4.5 कोटी रुपये असणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा इत्यादींसारख्या वरिष्ठ नेते, मंत्री आणि महनीय व्यक्तींची सुरक्षा सांभाळणाऱया सीआरपीएफकडे अशाप्रकारच्या जॅमर्सची मोठी कमतरता आहे. अशा स्थितीत सीआरपीएफला राज्यांच्या पोलीस विभागावर अवलंबून रहावे लागते. अनेक राज्यांकडे अशाप्रकारचे जॅमरयुक्त वाहने आहेत. परंतु केंद्र सरकारने अतिमहनीयांच्या सुरक्षेसाठी राज्यावर अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठे होणार वापर?

या जॅमर्सचा वापर विशेषकरून जम्मू-काश्मीर आणि नक्षलवादाने ग्रस्त क्षेत्रांमध्ये व्हीव्हीआयपींना असलेला धोका पाहून केला जाणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये स्फोटके हस्तगत होण्याचे प्रमाण वाढलेल्या भागांमध्येही याचा वापर केला जाईल. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये आयईडी हस्तगत होण्याचे प्रमाण वाढले आहे.

आरसीआयईडीचे कार्यस्वरुप

इम्प्रोव्हाइज्ड एक्स्पलोजिव्ह डिव्हायसेस म्हणजेच आयईडीद्वारे होणाऱया स्फोटाच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी हा जॅमर एक महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. यात वाहनावर जॅमर लावलेले असतात, जे आयईडी स्फोट घडवून आणण्यासाठी आवश्यक रेडिओ फ्रीक्वेंसी ब्लॉक करून टाकतो आणि अशाप्रकारे आयईडी स्फोट होत नाही. हा जॅमर शेकडो मीटरपर्यंतचा भाग सुरक्षित करतो.

Related Stories

रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ लसीची किंमत जाहीर

datta jadhav

भैंसा हिंसाचार, 25 जण अटकेत

Patil_p

शिवशाहिरांना अखेरचा मुजरा…

Patil_p

कर्तारपूर कॉरिडार पुन्हा खुला

Patil_p

देशातील ‘पहिला मतदार’ अनंतात विलीन

Patil_p

अजय देवगण, सूर्या ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

Amit Kulkarni