Tarun Bharat

राजवाडा परिसरात वडाप चालकास चोप

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

रविवारी दुपारी साताऱयात राजीव गांधी मल्टीपर्पज हॉलसमोर एकास तीन ते चार जण मारहाण करत असल्याची बाब अनेकांच्या निदर्शनास आल्याने बघ्यांनी लगेच गर्दी केली. ती माहिती त्याच परिसरात असलेल्या एका माजी नगरसेवकास समजताच ते तत्काळ तेथे पोहचून मध्यस्थी केली. त्यामुळे तणाव निवळला. दरम्यान, वडाप चालकाने युवतीची छेड काढल्याच्या कारणावरुन युवतीच्या नातेवाईकांनी चोप दिल्याची त्या परिसरात चर्चा सुरु होती. याची नोंद पोलिसात झाली नाही.

सातारा शहरात रविवारी बाजार असल्याने राजवाडा परिसरात गर्दी असते. राजवाडा परिसरात एका जीपमधून एक युवती राजवाडा येथील राजीव गांधी मल्टी पर्पज हॉलसमोर उतरली. सर्व प्रवाशीही त्यावेळी उतरले. तेव्हा तिकीटाचे पैसे देत असतानाच त्या जीप चालकास अचानक त्या युवतीच्या कुटुंबियानी मारहाण करायला सुरुवात केली. नेमके काय झाले, कोणी कोणाला मारले. कोणावर टोले पडले याची लगेच राजवाडा परिसरात सुरु झाली अन् चांदणी चौकात बघ्यांची एकच गर्दी झाली. या वादाची माहिती त्याच परिसरात आलेल्या माजी नगरसेवकास मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी मध्यस्थी केली अन् हा वाद निवळला. दरम्यान, या घटनेची नोंद शाहुपूरी पालिसांत झालेली नव्हती.

Related Stories

मेघोली अपघात हा `डाऊनस्ट्रिम’ केसिंगमुळेच..!

Abhijeet Shinde

मी प्युअर मराठा

datta jadhav

वाईच्या भाजी विक्रेत्यांनी केली स्वयंम स्फूर्तीने अँटीजेन टेस्ट

Abhijeet Shinde

पी. डी. पाटीलसाहेबांना अभिवादन

Patil_p

मंत्री अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

Abhijeet Shinde

नूतन आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी स्विकारला पदभार

Patil_p
error: Content is protected !!