प्रतिनिधी /वास्को
वाडे वास्कोतील महामार्गाच्या बाजुला असलेल्या तळय़ात बुधवारी सकाळी म्हैस अडकून पडल्याने तीला बाहेर काढण्यासाठी अग्नीशामक दल, पिपल्स फॉर ऍनिमल व स्थानिक कार्यकर्त्यांना धाव घ्यावी लागली. क्रेनच्या साहाय्याने त्या म्हशीला तळय़ातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
ही घटना बुधवारी सकाळी साड सहाच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे प्रथम अग्नीशामक दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पिपल्स फॉर ऍनिमल्सचे सेवकही घटनास्थळी हजर झाले. या म्हशीला सहज बाहेर काढणे कठीण ठरल्याने शेवटी क्रेन मागवण्यात आली. म्हशीला बांधून तळय़ातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. स्थानिक समाजसेवक कायतान झेवियर व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही या कामगीरीत सहभाग घेतला.