Tarun Bharat

विविध क्षेत्रातील दिवंगतांना वाहिली श्रद्धांजली

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

राज्य विधानसभेत आज अनेक दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर कार्डिनालपदी निवड झाल्याबद्दल आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांचे अभिनंदन करण्यात आले.

आर्चबिशप राहूल गोन्साल्वीस, स्वा. सै. गोपाळ चितारी, शिवानंद (नंदा) गायतोंडे, स्वा. सै. नकूळ नारू, फा. नेव्हील ग्रासियस, संतूर वादक पद्मभूषण पं. शिवकुमार वर्मा, प्रसिद्ध तियात्रिस्त मारियो मिनेझीस, प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नात, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एन्ड्रय़ू सायमंडस्, आदींचा त्यात समावेश होता. या सर्वांना एक मिनीट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांचा पोप फ्रान्सिस यांनी निवडलेल्या 21 कार्डिनालमध्ये समावेश झाल्याबद्दल सभागृहाने त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीची घोषणा हा तमाम गोमंतकीयांचा गौरव आणि सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे, असे त्यावेळी बोलताना सभापती रमेश तवडकर यांनी नमूद केले.

Related Stories

औद्योगिक क्षेत्रात भारतात गुंतवणूक वाढेल

Amit Kulkarni

गंगा नदीतील पर्याटनासाठी गोवा शिपयार्डने बांधलेल्या फेरी सेवेचे पंतप्रधानांकडून समर्पण

Omkar B

पूरग्रस्तांना दोन महिन्यात घरे

Omkar B

आदर्श युवा संघाच्या 21 व्या लोकोत्सवाचे उद्घाटन

Amit Kulkarni

प्ले-ऑफसाठी नॉर्थईस्टला ब्लास्टर्सविरुद्ध आज फक्त बरोबरीची आवश्यकता

Amit Kulkarni

अथॅल लोबो यांचा राजीनामा

Amit Kulkarni
error: Content is protected !!