Tarun Bharat

शेतकरी स्प्रिंकलरच्या प्रतीक्षेत

शेतकऱयांना 90 टक्के सबसीडीवर स्प्रिंकलर मंजूर

प्रतिनिधी /बेळगाव

पाण्याची बचत व्हावी आणि लहान शेतकऱयांना शेती करणे सोयीस्कर व्हावे यासाठी कृषी खात्यामार्फत शेतकऱयांना स्प्रिंकलरचे वाटप केले जाते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे स्पिंकलरचे वाटप झाले नाही. मात्र यंदा स्प्रिंकलरसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. रयत संपर्क केंद्रात ही व्यवस्था करण्यात आली आहे.

शासनाकडून अडीच एकरच्या वर आणि पाच एकरचा अल्पभूधारक शेतकऱयांना 90 टक्के सबसीडीवर स्प्रिंकलर मंजूर करून दिले जातात. या स्प्रिंकलर पाईप अनेक शेतकऱयांना उपयुक्त ठरतात. मात्र मागील दोन वर्षात स्प्रिंकलर मंजूर झाले नाहीत.

यासाठी शेतकऱयांना शेतीचा उतारा, तलाठय़ाची सही शिक्का, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. खरिप आणि रब्बी हंगामात शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेतात, पिकांना पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर उपयुक्त आहे. विशेषतः पाणी कमी असलेल्या शेतकऱयांना स्प्रिंकलरचा अधिक फायदा होतो. शिवाय फळ बागायत, फुल उत्पादक शेतकऱयांना स्प्रिंकलर गरजेचे आहे. त्यामुळे अलिकडे स्प्रिंकलरची मागणी वाढली आहे. कृषी खात्याकडून साधारण 2150 रुपयात 30 स्प्रिंकलर पाईप दिले जातात. या योजनेचा फायदा घेऊन अनेक शेतकऱयांनी शेती पिकविली आहे. मात्र दोन वर्षात कोरोनामुळे स्प्रिंकलर उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी स्प्रिंकलरच्या प्रतीक्षेत आहेत.

Related Stories

बेळगाव जिल्हा ई-केवायसीत प्रथम

Patil_p

आरटीपीसीआरची सक्ती मागे

Amit Kulkarni

कचरा गाडी जाळल्याच्या आरोपातून समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

Amit Kulkarni

सतीश जारकीहोळी यांची दुरदुंडेश्वर मठाला भेट

Patil_p

विजया क्रिकेट अकादमीकडे आर. जे. पाटील चषक

Patil_p

गुरुवारच्या पूजेसाठी बाजारात फळ – फुलांना मागणी

Omkar B