Tarun Bharat

वाकोडी-निंबोडी प्रकल्पाचा फेरविचार करणार – मुख्यमंत्री शिंदे

Advertisements

करमाळा/प्रतिनिधी

गेल्या अडीच वर्षाच्या काळात सत्तेच्या माध्यमातून कोणताही फायदा शिवसैनिकाला तथा शिवसेना मजबुती करण्यासाठी झाला नाही, मात्र येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेसाठी व शिवसैनिकांना मोठी ताकद देऊ तसेच सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी अद्याप जिल्हा वासियांना मिळालेले नसताना हे पाणी पुणे जिल्ह्यासाठी देत असलेल्या वाकोडी निंबोडी योजनेचा पुनर्विचार करू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील शिवसैनिकांना दिला आहे.

आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर माजी शहरप्रमुख संजय शीलवंत, राजेंद्र मिरगळ, उद्योगपती श्रीकांत पवार आदक पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी शिष्टमंडळाशी औपचारिक बोलताना आषाढीला मी पंढरपूरला येत असून या दिवशी फक्त शासकीय कार्यक्रम आहेत. मात्र सोलापुरातील प्रश्नासाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावू असे आश्वासन दिले. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील कोणताही शिवसैनिक माझ्याकडे काम घेऊन आला तर त्याला मोकळ्या हाताने परत पाठवणार नाही असा विश्वास देऊन येणाऱ्या काळात शिवसैनिकाला ताकद देणे, त्याला मजबूत करणे व त्या माध्यमातून संघटना मजबूत करणे याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या काँग्रेसच्या ९ आमदारांना नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात 20 लाख रुपये किमतीची रुग्ण वाहिका करमाळा तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी मोफत दिली. होती या रुग्णवाहिकेतून ३७२ रुग्णांना मोफत नवीन हॉस्पिटलला हलवण्यात मदत झाली. याचाही आढावा वैद्यकीय मदत पक्षाचे समन्वयक दीपक पाटणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिला.

Related Stories

करमाळा शहरातील व्यापार्यांचा जनता कर्फ्यूसाठी प्रतिसाद

Archana Banage

सोलापुरात दोन दिवसात 16.4 मिमी पाऊस

Archana Banage

बार्शीतील कासारी येथे रेशन मोफत धान्य वाटले नसल्याची तक्रार

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 291 पॉझिटिव्ह, 8 जणांचा मृत्यू

Archana Banage

गोवा बनावटीचा 44 लाखाचा मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

Archana Banage

लातुरात वाईन शॉपवर तुफान गर्दी

Archana Banage
error: Content is protected !!