वृत्तसंस्था/ वेल्स (ब्रिटन)
फिफाच्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेत वेल्सने तब्बल 64 वर्षांनंतर प्रवेश केला आहे. आता 2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी वेल्सने आपले तिकीट आरक्षित करताना युक्रेनचे आव्हान संपुष्टात आणले.
आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी रविवारी येथे झालेल्या पात्र फेरीच्या प्लेऑफ गटातील शेवटच्या लढतीत वेल्सने युक्रेनचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात युक्रेनच्या गॅरेथ बेलच्या फ्रीकिकवर युक्रनेच्या अँड्री यारमोलेंकोने आपल्याच गोलपोस्टमध्ये हेडरद्वारे गोल नोंदविल्याने वेल्सला बोनस गोल मिळाला. या विजयामुळे वेल्सला तब्बल 64 वर्षांनंतर फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध झाली. यापूर्वी म्हणजे 1958 साली वेल्सने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. रविवारच्या प्लेऑफ अंतिम सामन्यात युक्रेनच्या यारमोलेंकोने 12 व्या मिनिटाला आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू मारून वेल्सला हा एकमेव बोनस गोल बहाल केला. त्यानंतर युक्रेनला शेवटपर्यंत गोल नोंदविता आला नाही.