Tarun Bharat

चालण्याने वजन व पोटावरची चरबी कमी होते का? जाणून घ्या माहिती

वजन वाढणे सोपे असते पण वाढलेले वजन कमी करणे खूप कठीण असते. त्यातल्या त्यात पोटावरील वाढलेली चरबी कमी करणे हे अतिशय कठीण. वजन कमी करणे ही दीर्घकाळ चालणारी प्रकिय़ा आहे. यासाठी योग्य आहार, डायट आणि योग्य व्यायामाची गरज असते. एवढ करूनही कधीकधी पोटावरची चरबी कमी होत नाही. बरेचजण फक्त चालण्याचा व्यायाम करतात. याने देखील वजन कमी होण्यास मदत होते. चालण्याने वजन व पोटावरची चरबी कमी होते का? तसेच रोज किमान किती चालणे आवश्यक आहे? या प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत.


दररोज किती चालावे

दररोज किमान ८ ते १० हजार स्टेप चालल्या पाहिजेत. यासाठी तुम्ही किती स्पीडने चालता यावर वजन लवकर की वेळाने कम कमी होते हे ठरते. तुमचं वय आणि वजन य़ानुसार चालण्याचा स्पीड तुम्ही ठेवला पाहिजे. यासाठी दररोज किमान १ तास चालले पाहिजे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा चालणार असाल तर रोज १५ मिनिटे चाला. यानंतर आठवड्याने वेळ वाढवा. हळूहळू वेळ वाढवत तुम्ही तासभर चालण ठेवा. तुम्हाला जर एकावेळी एकतास चालण शक्य नसेल तर तुम्ही तिन टप्यात किंवा दोन टप्प्यात चालू शकता.

कधी चालाव

शरीराला ऑक्सीजन मिळण्यासाठी शक्यतो रोज सकाळी मोकळ्या हवेत चाला. कारण सकाळीच हवा शुध्द असते आणि आपला मूड फ्रेश होण्यासाठी सकाळचं चालण अतिशय चांगल. त्याचबरोबर दिवसभर स्ट्रेंथ राहण्यास मदत आहे. तसेच चालताना वय आणि वजन याचा विचार करा. तुम्हाला जेवढं हेल्ही चालता येईल तेवढं चाला. एकदम चालण वाढवू नका. तसेच डायट ही चालू ठेवा. याशिवाय तुम्ही तुमच्या घराला जिना असेल किमवा तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर जिने चढण्यास पसंदी द्या. जिना चढण्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

एक्सरसाइज आणि एक्सरशन

अनेक स्त्रियांचा समज असतो की, मी दररोज घरात खूप काम करते त्यामुळे माझे वजन कमी होते. असा समज करून घेऊ नका कारण ते दिवसभराचं एक्झरशन असतं. एक्सरसाइज आणि एक्झरशन यामध्ये खूप फरक आहे. एक्ससाइज तुम्ही शांत डोक्यानं करायचं असतं. धावपळीत व्यायाम किंवा चालणं योग्य नाही. कारण याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या शरीरावर होत असतो. यासाठी चालण हे इतर कामात न करता त्यासाठी रोज किमान ४५ मिनिटे ते १ तास द्या. याचा नक्कीच फायदा तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यास आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

Related Stories

जाणून घ्या ब्लॅक टी पिण्याचे फायदे

Kalyani Amanagi

प्रदूषणामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू

Archana Banage

मुंबईत घरोघरी जाऊन सध्या तरी कोरोना लस नाही : किशोरी पेडणेकर

Archana Banage

लडाखच्या 2 दिवसीय दौऱ्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

Amit Kulkarni

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये : संजय राऊत

prashant_c

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांवर

datta jadhav