Tarun Bharat

पावसामुळे भिंत कोसळून मायलेकराचा बळी

Advertisements

सौंदत्ती तालुक्मयातील माडमगेरी येथील दुर्दैवी घटनाः दोघी जखमी

प्रतिनिधी/ बेळगाव

पावसामुळे भिंत कोसळून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील आणखी एक तरुणी आणि एक महिला अशा दोघी जखमी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सौंदत्ती तालुक्मयातील माडमगेरी येथे ही घटना घडली आहे.

घटनेची माहिती समजताच मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील, तहसीलदार महांतेश मठद, पोलीस उपनिरीक्षक बसनगौडा आदींसह पोलीस व महसूल खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना इस्पितळात हलविण्यात आले आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. यल्लव्वा महादेव बागिलद (वय 40), तिचा मुलगा प्रज्ज्वल (वय 5 वर्षे) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मायलेकरांची नावे आहेत. उद्दव्वा बागिलद (वय 35) व रुपा बागिलद (वय 17) या जखमी झाल्या आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे महादेव बागिलद यांच्या घराची भिंत भिजली होती. मातीची भिंत असल्याने ती कमकुवत बनली होती. शनिवारी सायंकाळी घरातील सर्व मंडळी आपल्या कामात असताना भिंत कोसळून यल्लव्वा व प्रज्ज्वल हे दोघे ढिगाऱयाखाली सापडले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. मायलेकराचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Related Stories

मलप्रभा साखर कारखान्यामधील प्रलंबित बिले तातडीने द्या

Amit Kulkarni

अट्टल दुचाकी चोराला अटक

Omkar B

निपाणीत चोरटय़ांनी बंद घर फोडले

Patil_p

जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

Patil_p

भू-स्वाधीन कायद्याचा दुरुपयोग करणाऱयांना न्यायालयाचा दणका

Amit Kulkarni

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सच्या 24 व्या शोरूमचा शुभारंभ

Patil_p
error: Content is protected !!