Tarun Bharat

महापालिकेला मतदान करायचंय… आताच सावध व्हा!

प्रारूप मतदार यादीत नावाची नोंद असल्याची खात्री करण्याची गरज : अंतिम मतदार यादीनंतर बदल अशक्य -मतदानापासून वंचित राहण्याचा धोका :ऐनवेळीच धावपळ टाळण्यासाठी आताच जागृत राहणे आवश्यक

कोल्हापूर/विनोद सावंत

महापालिकेत मतदान करायचय… मग आताच सावध व्हावे लागणार आहे. ऐन मतदानावेळी धावपळ करायची नसेल तर मतदारांनी जागरूक राहिले पाहिजे. महापालिका आज, गुरूवारी प्रारूप मतदार यादी जाहीर करणार आहे. या यादीत आपल्याच वॉर्डमध्ये नावा आहे की नाही, याची शहानिशा करणे आवश्यक आहे. अन्यथा एकदा मतदार यादी अंतिम झाली तर त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याचा धोका आहे.
महापालिकेने नवीन प्रभाग रचनेनुसार 31 वॉर्डमधील प्रारूप मतदार यादी केली आहे. या यादीमध्ये नाव असल्याची खात्री मतदारांनी करून घेणे आवश्यक आहे. काही वेळेस एका वॉर्डमध्ये राहत असताना दुसऱया वॉर्डमध्ये नावाची नोंद झाल्याचा अनुभव आहे. मग ऐन मतदानावेळी धावपळ करावी लागते. यामध्ये अनेकजण मतदान न करताच माघारी परतल्याचीही उदाहरणे आहेत. ही स्थिती महापालिका निवडणूकीत होवू नये यासाठी प्रारूप मतदार यादी अवर्जुन पाहणे आवश्यक आहे.

मतदारांनी जागृत्त राहणे आवश्यक

मतदान केंद्रावर नाव नसल्याने नागरिक प्रशासनातील अधिकाऱयांसोबत वाद घातला जातो. वास्तविक जेव्हा प्रारूप मतदार यादी जाहीर होते तेव्हा प्रशासनाकडून नागरिकांना यादी पाहण्याचे आवाहन केले जाते. मात्र, इच्छुकांव्यतरिक्त मतदार यादी पाहण्याकडे फारसे कोणी फिरकत नाही.

उत्तर’मध्ये सुमारे 5 हजार नावे गायब?

नुकतीच कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीत सुमारे 5 हजार मतदारांचे नावे यादीत नसल्याचा आरोप भाजप-ताराराणी आघाडीने केला होता. असा प्रकार महापालिका निवडणूकीत व्हायचा नसल्यास इच्छुकांसह नागरिकांनीही प्रारूप मतदार यादीकडे दुर्लक्ष न करता ती मुदतीमध्ये जावून पाहणे आवश्यक आहे.

सात वॉर्डमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज

प्रभाग रचनेनच्या हरकतीनंतर वॉर्ड क्रमांक 2,3, 12, 13, 14, 18 आणि 20 या सात वॉर्डमध्ये बदल झाले आहे. येथील मतदारांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादी पहावी

प्रारूप मतदार यादी त्रुटी राहणार नाही, अशीच केली आहे. तरीही ऐनवेळी धावपळ होवू नये, मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व नागरिकांनी प्रारूप मतदार यादी पाहणे आवश्यक आहे. हरकत दिल्यास अंतिम मतदार यादीत सुधारणा करण्यास वाव आहे.
रविकांत आडसुळ, उपायुक्त, महापालिका

मतदारानी काय करावे


-प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित कार्यालयात जावून यादी पाहणे.
-आपल्याच वॉर्डमध्ये नाव असल्याची खात्री करणे.
-आपल्या वॉर्डत नाव नसल्यास तत्काळ लेखी हरकत दाखल करणे.
-अंतिम मतदार यादी पाहून हरकतीनुसार बदल झाल्याची खात्री करणे.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : वारणेचे वस्ताद प्रकाश पाटील यांचे निधन

Abhijeet Shinde

`बैतुलमाल’चा पुरग्रस्त ३ गावांना मदतरुपी आधार

Abhijeet Shinde

अभिनेते महेश कोठारेंना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde

नोटीस देवून विनापरवाना बांधकाम सुरु, सहा जणांवर गुन्हा नोंद

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सहा प्रभागात बदल, बारा प्रभागांवर परिणाम !

Abhijeet Shinde

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्रीला ब्रेक; शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!