Tarun Bharat

महाराष्ट्र अलर्ट मोडवर…

चार दिवस कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

पुणे / प्रतिनिधी :

मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर धुवाँधार पाऊस बरसत असून, अवघा महाराष्ट्रात आता जलमय झाला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस कोकण व गोव्याला, तर दोन दिवस मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट, तसेच मराठवाडा व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Warning of heavy rains in Central Maharashtra including Konkan-Goa for four days)

कच्छ व लगतच्या भागावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेला ट्रफ तसेच सक्रिय मान्सूनमुळे महाराष्ट्रात दमदार पाऊस होत आहे. गेल्या आठवडय़ात सुरुवात झालेल्या या पावसाने आता रौद्र रुप धारण केले आहे. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात पाऊस घेऊन येत आहेत. यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. काही शहरांनी या आठ दिवसाच्या कालावधीतच जुलैची सरासरी ओलांडली आहे.

विदर्भात नागपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला या भागात वादळी पाऊस नोंदविण्यात येत असून, येथील नदी व नाल्यांना पूर आला आहे. मराठवाडय़ातही अनेक भागात पाऊस झाल्याने शेतीच्या पाण्याचे संकट मिटले असून, पेरण्यांना वेग आला आहे. मध्य महाराष्ट्रात गेले दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला होता. कोल्हापूर तसेच सातारा जिल्हयात पावसाने झोडपले असून, अनेक नद्यांना या भागात पूर आला आहे. एनडीआरएफची टीम येथे तैनात करण्यात आली असून, नदीकाठच्या गावांना पूरपरिस्थिती बाबत सजग करण्याचे काम केले जात आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात पावसाने धूमशान घातले आहे. गेले दोन दिवस पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्गात पावसाने राडा घातला असून, या भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच अनेक वाडय़ा वस्त्यांमध्ये पाणीही शिरले आहे. एनडीआरएफची पथके या भागातही तैनात करण्यात आली आहेत. कोकण-गोव्याला पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मागच्या 24 तासांत राज्याच्या काही भागांत नोंदविण्यात आलेला पाऊस पुढीलप्रमाणे : मुंबई 110.6, पुणे 16.3, औरंगाबाद 12.9, नाशिक 10, कोल्हापूर 14.4, सोलापूर 4.6, रत्नागिरी 43, सातारा 11.2, सांगली 3.8, परभणी 2.3, अकोला 1.9 तसेच पणजी 19.4

विविध जिल्हय़ात पुढील दोन दिवसाची पावसाची स्थिती पुढीलप्रमाणे :

पालघर-ठाणे-मुंबई-सिंधुदुर्ग – 8 जुलै रेडअलर्ट.
रायगड-रत्नागिरी-पुणे -सातारा – 8 व 9 जुलै रेडअलर्ट
कोल्हापूर – 8 जुलै रेडअलर्ट

Related Stories

सौर उर्जेपासून विजनिर्मितीमध्ये भारत आघाडीच्या राष्ट्रांमध्ये- पंतप्रधान मोदी

Abhijeet Khandekar

प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री लोढांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

Archana Banage

राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. प्राची पवार यांच्यावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला

datta jadhav

मुंबई : प्रेमसंबंधातून तरुणीची हत्या; त्यानंतर प्रियकराची आत्महत्या

Tousif Mujawar

बिहार : मागील चोवीस तासात 18 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 767 वर

Tousif Mujawar

मलिक आणि देशमुखांची पुन्हा उच्च न्यायालयात धाव

Archana Banage