Tarun Bharat

कार व दुचाकीच्या अपघातात वाटंगीचे उद्योजक रोहन देसाई यांचा मृत्यू

किणे वार्ताहर
वाटंगीचे उद्योजक रोहन देसाई यांचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, वाटंगी व आजरा परिसरात शोककळा पसरली आहे.

आजरा गडहिंग्लज मार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात वाटंगीचे उद्योजक रोहन देसाई गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

व्यंकटराव हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका सौ वृशाली देसाई व सदानंद देसाई यांचा रोहन हा मुलगा असून अगदी कमी वयात उद्योग व्यवसायात यशस्वी झालेल्या रोहन देसाई यांच्या जाण्याने वाटंगी व आजरा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे .

Related Stories

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Archana Banage

कोल्हापूर : चौथ्या टप्प्यात साडेअकरा लाख जणांना देणार कोरोना लस

Archana Banage

कोल्हापूर : पाटगांव येथील मौनी सागर जलाशय १०० % भरले

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे १८२४ नवे रुग्ण, ३३ बळी

Archana Banage

संगणक परिचालक करणार राज्यभर निषेध आंदोलन

Archana Banage

थकीत एफआरपीच्या व्याजाची सुनावणी पुर्ण, निर्णयाकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा

Archana Banage