Tarun Bharat

मोबाइल स्पीकर मध्ये पाणी गेलयं ? मग वापरा गूगल वरील ही खास ट्रिक

आजकाल मानवासाठी अन्न वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच मोबाइलला ही मूलभूत गरज बनली आहे.मग आपण कुठेही गेलो तरी आपल्यासोबतच मोबाइलला असतोच.पावसाळ्यात जरी मोबाइल भिजण्याची शक्यता असली तरी प्रत्येक जण योग्य ती काळजी घेऊन मोबाइलला वापरतो. पण कधी कधी पावसाळ्याच्या दिवसात किंवा अनावधानाने आपल्या मोबाइल स्पीकर मध्ये पाणी जाऊ शकते. अशावेळी मोबाइल स्पीकर खराब होण्याची शक्यता असते. परिणामी स्पीकर मधून विचित्र आवाज देखील येऊ शकतो.मग अशावेळी तुम्हाला जर मोबाइल स्पीकर मधील पाणी काढायचे असेल तर गुगल वर एक खास ट्रिक आहे. ज्याद्वारे तुमच्या मोबाइल मधील पाणी सहज निघू शकते.

स्पीकर मधील पाणी काढण्यासाठी सर्वप्रथम गुगल ओपन करा. यानंतर त्यावर fix my speaker सर्च करा. सर्च केल्यांनतर फिक्स माय स्पीकर च्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला एक सिम्बॉल दिसेल.त्यावर क्लिक केल्यावर एक विशिष्ट प्रकारचा आवाज येईल.ज्यामुळे ध्वनी लहरी निर्माण होतात आणि स्पीकरमधील पाणी बाहेर काढले जाऊ शकते.तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हीही मोबाइल स्पीकर खराब होण्यापासून वाचवू शकता.

Advertisements

Related Stories

कोरोना उपचारासाठी एनपीएसमधून पैसे काढणे शक्य

Patil_p

सायना नेहवालने केला भाजपमध्ये प्रवेश

prashant_c

हेगडेंच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ

prashant_c

गंभीर आजाराने पुतीन यांचा मृत्यू; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

datta jadhav

देशात मागील 24 तासात 63,509 नवे कोरोना रुग्ण; 730 मृत्यू

datta jadhav

नरेंद्र मोदींचे शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट, खात्यात जमा करणार १२ हजार कोटी

prashant_c
error: Content is protected !!