पावसाचा जोर कायम : वाळवंटी नदीची पातळी वाढली
प्रतिनिधी /सांखळी
सांखळी मतदारसंघात आज दिवसभर जोराचा पाऊस पडल्याने होंडा-फोंडा रस्त्यावर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकी अडथळा निर्माण झाला. वाहन चालकांना पाण्यातून वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागली. होंडा, सोनशी, डिंगणे, बाये, वेळगे, पाळी आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचत असून रस्ता qिवभागाच्या अधिकाऱयांनी पाहणी करून सदर तुंबणाऱया पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
राज्यात पावसाने जोर कायम असून, मंगळवारी सांखळी मतदारसंघात दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने नगरपालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यावर पाणी साचून रस्ते तुडुंब भरलेले होते. वाळवंटी नदी तुडूंब भरून वाहत होती. नदीच्या पाण्याची पातळी संध्याकाळपर्यत वाढतच होती. पाळी, वेळगे, आमोणा, न्हावेली, कुडणे, हरवळे आदी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
सांखळी शहरातील ऐतिहासिक किल्ल्याचे सुशोभिकरणाचे काम सरकारने हाती घेतले आहे. बांधकाम सुरू असलेल्या किल्ल्याच्या मागील भिंतीवर प्लास्टिक कापड घालून झाकले आहे. उर्वरित भिंत पावसात भिजत असल्याने संबंधित अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन सदर भिंत पूर्णपणे झाकवी, अशी मागणी होत आहे.