Tarun Bharat

सत्तरीत अनेक गावांत पाणी समस्या सुरूच

गढूळ पाण्यामुळे दाबोस पाणी प्रकल्पावर परिणाम

प्रतिनिधी /वाळपई

गेल्या तीन दिवसांपासून सत्तरी तालुक्मयाच्या विविध भागांमध्ये पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. आज तिसऱया दिवशी अशाच प्रकारचे परिस्थिती पहावयास मिळाली. यामुळे अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. तरीही पाण्याची कमतरता असल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात घाटमाथ्यावर पाऊस लागल्यामुळे दाबोस पाणी प्रकल्पाला पुरवठा करणाऱया पाणीपुरवठा गढुळ येत असल्यामुळे दाबोस पाणी प्रकल्पाच्या यंत्रणेवर पाणी शुद्धीकरण करताना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे अपेक्षित पाणीपुरवठा शुद्ध होत नसून यामुळे पाणीपुरवठा करण्यावर अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकारी सूत्रांचे म्हणणे आहे.

 गेल्या दोन दिवसापासून वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठय़ावर परिणाम होत असल्याचे पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱयांचे म्हणणे होते. मात्र शुक्रवारीही दिवसभर अशीच स्थिती होती. गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार कोसळत असल्यामुळे नद्यांना गढूळ पाणी येत आहे. यामुळे हा पाणीपुरवठा पाणी प्रकल्प शुद्ध करताना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. गढूळ पाण्यामुळे शुद्धीकरण यंत्रणेवर ताण येत असल्याने आवश्यक प्रमाणात पाणी शुध्द होत नसल्याचे अधिकाऱयांनी  स्पष्ट केले. यामुळे पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम होत आहे. सत्तरी तालुक्मयामील दोन्ही आमदारांनी विशेष लक्ष देऊन गांभीर्याने या संदर्भात विचार करावा व अद्ययावत यंत्रणा प्रकल्पासाठी उपलब्ध करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावे, अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केलेली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून कोपर्डे भागात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. टँकरसेवा असूनही नागरिकांना विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागले. दरम्यान या संदर्भात स्थानिक पंच सभासद सयाजी सावंत व राधिका सावंत यांनी विशेष लक्ष देऊन सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याचे अधिकाऱयांशी संपर्क साधून गावांमध्ये पाणीपुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले. शेवटी पाणीपुरवठा कार्यालयाचे अधिकारी प्रत्यक्षपणे गावांमध्ये येऊन या संदर्भाची पाहणी केली असता काही ठिकाणी पाणी नियंत्रित करणाऱया यंत्रणेमध्ये दुरुस्ती केल्यानंतर संध्याकाळी उशिरा अनेक घरांना हळूहळू पाणीपुरवठा झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. दरम्यान तीन दिवसापूर्वी स्थानिक तरुण राजेश सावंत यांनी या संदर्भाची  तक्रार वाळपई सार्वजनिक पाणीपुरवठा कार्यालयात केली होती. त्याची यावेळी दखल घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेली आहे. दरम्यान सयाजी सावंत यांनी  गावात पाणीपुरवठा होण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केलेले आहेत. या संदर्भात अधिकाऱयांशी संपर्क साधला होता. याची दखल घेऊन अधिकाऱयांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याचे सयाजी सावंत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले

Related Stories

देशातील प्रादेशिक पक्षांची कार्यशैली शिकतोय

Patil_p

कोरोना : 70 बळी, 2865 बाधित

Amit Kulkarni

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार

Amit Kulkarni

‘बॅटल ऑन शिप’साठी विजेंदर-लॉप्सन पणजीत दाखल

Amit Kulkarni

मांडवी हॉटेल कर्मचाऱयांचे आझाद मैदानावर धरणे

Amit Kulkarni

वेळगेत गुरांच्या तस्करीवर पोलीस कारवाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!