Tarun Bharat

तब्बल दहा दिवसानंतर पाणीपुरवठा

Advertisements

बेळगाव प्रतिनिधी – सह्याद्रीनगर, सारथीनगर, पोलीस कॉलनी, डी ग्रुप कॉलनी, आणि आश्रय कॉलनी येथे दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा बॉक्साईट रोड येथे रस्ता रोको करू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या सर्व परिसराला पाणी नसल्यामुळे टँकरने पाणी खरेदी करावे लागत आहे. या पाण्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. याबाबत अनेक वेळा एल अँड टी या पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे अखेरचे निवेदन असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. महसूल अधिकारी एस. एम. बरगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नामदेव हट्टी, एस. एस. नागणूर बी.आर. ढाबळे, स्वामी हिरेमठ, आरिफ खान, एम. डी कलशेट्टी यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

Related Stories

कपिलेश्वर मंदिरमध्ये आदियोगीची प्रतिकृती

Amit Kulkarni

मंगळवारी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडीत

Patil_p

पोषक आहार हा आरोग्याचा पाया

Amit Kulkarni

सिव्हिल हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी तुडुंब

Patil_p

खोदाईमुळे हिंदवाडीतील रस्ते बनले चिखलमय

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना शूर सैनिकांची नावे देणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!