► प्रतिनिधी
बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणार्या हिडकल जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गळतीच्या दुरुस्तीचे काम गुरूवार दि. 16 पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 17 व 18 रोजी शहरांच्या विविध भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या पंधरा दिवसात दुसर्यांदा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. एलअँडटी कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हिडकल ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एमएस आणि सिमेंटच्या पाईप घालण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्या जुन्या असल्याने ठिकठिकाणी गळती लागली आहे. गळतीद्वारे पाणी वाया जात असल्याने शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करता येत नाही. मुबलक पाणी देण्यासाठी गळती निवारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गळती लागलेल्या एम एस पाईप आणि सिमेंटच्या पाईपची दुरुस्ती करण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कुंदरगी आणि फॉरेस्ट चेकपोस्ट जवळील दोन्ही पंप बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. दि. 17 व 18 असे दोन दिवस चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसह विविध भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे.
एलअँडटी कंपनीच्यावतीने आवाहन
दक्षिण विभागातील मजगाव, नानावाडी, चिंदबरनगर, शहापूर, वडगाव आणि जुनेबेळगाव तर उत्तर विभागातील सहय़ाद्रीनगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, बसवकॉलनी, कलमेश्वरनगर, सुभाषनगर, अशोकनगर, माळमारुती वसाहत, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कुडची आदी भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे कॅटोन्मेbट, हिंडाल्को कारखाना, केआयडीबी औद्योगिक वसाहत, डिफेन्स एरिया, सैनिकनगर, केएलई रुग्णालय , जिल्हा रुiणालय त्याचप्रमाणे जलवाहिनी घालण्यात आलेल्या पाfरसरातील गावांचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलअँडटी कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.