वृत्तसंस्था/ बॅसेल (स्वीस)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या स्वीस इनडोअर खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत गुरुवारी स्वीसचा स्टॅनिसलास वावरिंका आणि बॉटिस्टा ऍग्युट याने प्रतिस्पर्ध्यावर शानदार विजय नोंदविला.
वावरिंकाने दुसऱया फेरीतील सामन्यात ब्रेन्डॉन नाकाशिमाचा 6-4, 5-7, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे दुसऱया एका सामन्यात रॉबर्टो ऍगटने ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचा 6-3, 6-2 असा फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. वावरिंका आणि ऍगट यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल.