वृत्तसंस्था/ बॅस्टड, स्वीडन
पाब्लो कॅरेनो बुस्टाने येथे सुरू झालेल्या नॉर्डीया ओपन स्पर्धेत विजयी सुरुवात करताना टूर लेव्हलवर 16 स्पर्धा जिंकणाऱया स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाला पराभवाचा धक्का दिला.
पाचवे मानांकन असलेल्या बुस्टाने प्रत्येक सेटमध्ये एक बेक मिळवित माजी जागतिक तिसऱया मानांकित वावरिंकाला 7-5, 6-4 असे हरविले. पायाला झालेल्या दुखापतीमुळे वावरिंकाला 13 महिने टेनिसपासून अलिप्त रहावे लागले होते. पुनरागमनानंतर त्याची ही टूरवरील सहावी स्पर्धा होती. दुसऱया फेरीत बुस्टाची लढत अल्बर्ट रॅमोस व्हिनोलेस किंवा टॉमस मार्टिन एचेव्हेरी यापैकी एकाशी होईल.