Tarun Bharat

अँडी मरेकडून वावरिंका पराभूत

Advertisements

वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी वेस्टर्न आणि सदर्न पुरुषांच्या  खुल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू अँडी मरेने एकेरीत विजयी सलामी देताना स्वीसच्या स्टॅनिसलास वावरिंकाला पराभवाचा धक्का दिला.

या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात 35 वर्षीय मरेने वावरिंकावर 7-6 (7-3), 5-7, 7-5 अशी मात करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात मरेने पहिला सेट जिंकल्यानंतर वावरिंकाने दुसरा सेट जिंकून रंगत आणली. तिसरा सेट अटीतटीचा झाला पण मरेने आपली सर्व्हिस अधिक वेळ राखत वावरिंकाचे आव्हान संपुष्टात आणले. ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीने डॅन होल्गर रुनेचा 7-6(7-5), 4-6, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना अडीच तास चालला होता.

या स्पर्धेत पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस आणि कोकिनाकीस या जोडीने सिमोनी बोलेली आणि फॉगनेनी यांचा 6-0, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱया एका सामन्यात ब्रिटनचा जेमी मरे आणि ब्रुनो सोआरेस यांनी आठव्या मानांकित जुआन सेबॅस्टियन काबाल आणि रॉबर्ट फारा यांच्यावर 4-6, 6-2, 10-7 अशी मात करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

बुद्धिबळ स्पर्धेत संकल्प गुप्ताला रौप्यपदक

Patil_p

लॉकी फर्ग्युसनने केले विजयाचे ‘लॉकिंग’!

Patil_p

भारताच्या महिला नेमबाज संघाला सुवर्ण

Patil_p

पद्मावती रॉयल्स,पी.पी. रॉयल्स, पुष्पांजली, ओशोरा उपांत्य फेरीत

prashant_c

झिंबाब्वे मालिकेसाठी पाक संघ घोषित

Patil_p

ओसाका विजयी, मरे पराभूत

Patil_p
error: Content is protected !!