Tarun Bharat

‘आम्ही गाबित’अभियानाचा मालवणात शुभारंभ

‘We Are Gabit’ campaign launched in Malvan

तालुक्यात ‘गाबित गणना’ करणार

मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने सोमवारी ‘आम्ही गाबित’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आम्ही गाबित नावाच्या बिल्ल्यांचे यावेळी अनावरण करण्यात आले. आम्ही गाबित अभियानातंर्गत तालुक्यातील गाबित कुटुंबांचा सर्वे करून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नोंद घेतली जाणार आहे. गाबित समाजबांधवाना भेडसावणारा जात पडताळणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही गणना महत्वाची ठरेल, असा विश्वास यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक पंकज सादये, इंजिनियर लक्ष्मीकांत खोबरेकर, पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू, श्रमिक मच्छीमारचे बाबी जोगी, अरविंद मोंडकर, अतुल मालंडकर, मिथुन मालंडकर, अन्वेषा आचरेकर, रश्मीन रोगे, नरेश हुले, पूजा सरकारे, राधिका कुबल, संतोष ढोके, पवनकुमार पराडकर, महेश जुवाटकर, दिक्षा ढोके, अनुष्का आचरेकर, सन्मेश परब, संदीप मालाडकर आदी उपस्थित होते.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

अखेर पांजरवाडा पुलाचे काम पूर्णत्वाकडे

Anuja Kudatarkar

सरपंच पद आरक्षण 28 जानेवारी रोजी

NIKHIL_N

बेपत्ता गतिमंद मुलाची झाली आईसोबत भेट

NIKHIL_N

मालवण पोलिसांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

NIKHIL_N

भालचंद्र बाबांच्या जन्मोत्सव सोहळय़ास कणकवलीत प्रारंभ

NIKHIL_N

जागतिक पर्यावरण दिनी तांबोळी वनबागेत बीजारोपण

Anuja Kudatarkar