Tarun Bharat

राऊतांवरील कारवाईमुळे आम्ही आनंदी; बंडखोर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची घरी ईडीने छापेमारी केली आहे. मागील चार तासांपासून ईडीचे 10 अधिकारी राऊत दाम्पत्याची चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे शिवसेनेत खळबळ उडाली असतानाच शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवरील कारवाईमुळे शिंदे गटाला आनंद झाल्याची तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले, संजय राऊत हुशार नेते आहेत. त्यांना ईडी वगैरे कशाची भीती वाटत नाही. त्यांना आत्मविश्वास आहे की, आम्ही जे करतो ते खरं आहे. जेव्हा एवढी मोठी धाड पडते, तेव्हा अटकेची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला. ज्याच्यामुळे, ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे.

गेल्या चार-पाच वेळापासून ईडीने त्यांना समन्स बजावला होता. त्यांची चौकशीही सुरू होती. जर त्यांनी काही केलं नसेल तर ते सुटतील. पण, त्यांनी जे काही घोटाळे केले आहे, जो भ्रष्टाचार केला आहे, त्यात त्यांचा हात असल्याचे दिसून येत आहे. जर राऊत यांना अटक झाली तर शिवसैनिक खूश होतील. शिवसैनिकांची भावना होती. मातोश्रीला त्रास देण्याचे काम केले त्याच्यावर जर ईडीची रेड झाली तर काही आश्चर्य वाटण्याचे काम नाही. जो जैसा करेगा वैसा भरेगा, असंही शिरसाट म्हणाले.

हेही वाचा : मरेन पण शरण जाणार नाही, राऊतांकडून ट्विट्सचा धडाका

Related Stories

मानसिक समुपदेशनासाठी अंनिसची हेल्पलाईन

tarunbharat

चाकरमान्यांना 10 दिवस क्वारंटाईनचा निर्णय अंतिम

Patil_p

चक दे कोल्हापूर…..मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचं रुप

Archana Banage

राज्याने गाठला कोरोना चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा

prashant_c

वैदिक काळातील कायदे शिकणार विद्यार्थी

Patil_p

देशात हिंदूंचेच सर्वाधिक धर्मांतर

Patil_p