साऊंड ऍण्ड लाईट असोसिएशनच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वांना एकच न्याय दिला पाहिजे. मात्र बेळगावात एक तर इतर जिल्हा आणि राज्यांमध्ये एक न्याय. याचबरोबर एका सार्वजनिक कार्यक्रमाला एक न्याय तर दुसऱया कार्यक्रमांना दुसरा न्याय, हे योग्य आहे का? गणेशोत्सव हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. बेळगावात भव्य मिरवणूक काढली जाते. मात्र या मिरवणुकीवेळी डीजेला वेगवेगळे नियम लादण्यात येत आहेत, हे योग्य नाही. तेव्हा याचा सारासार विचार करावा, आम्ही दोन टॉप-दोन बेस लावण्यास तयार आहे. मात्र त्यालाही जर कोणी विरोध केला तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा साऊंड आणि लाईट असोसिएशनच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.
…तर आम्ही एकजुटीने त्याला विरोध करू
जत्तीमठ येथे साऊंड ऍण्ड लाईट असोसिएशनची बैठक झाली. यावेळी शाम गौंडाडकर आणि उपाध्यक्ष साई कणेरी यांनी हे स्पष्ट केले आहे. धारवाड, हुबळी यासह बेळगाव जिल्हय़ातील इतर तालुक्मयांमध्ये 4 टॉप, 4 बेस आणि त्यापेक्षाही अधिक डीजेला परवानगी दिली गेली आहे. ते भारतात राहत नाहीत का? असा प्रश्नदेखील यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही प्रशासनाचा आदर राखूनच काम करण्याचे ठरविले आहे. मात्र तरीदेखील आम्हाला जाणूनबुजून त्रास करत असाल तर आम्ही एकजुटीने त्याला विरोध करू, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी मागणीदेखील काही व्यावसायिकांनी केली आहे.
यावेळी मधु ताशिलदार यांनी राजकीय कोणताही कार्यक्रम असताना हवा तेवढा आवाज केला जातो. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आमच्या हिंदू सणांवरच का नियम लादले जात आहेत? सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशाला एक आदेश दिला आहे. त्या आदेशाचे पालन इतर जिल्हय़ांमध्ये का केले जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आमची अडवणूक करत असाल तर ते चुकीचे आहे. अडवणूक केला तर त्याचठिकाणी आम्ही ठाण मांडून विसर्जन मिरवणूकच थांबवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
डीजे साहित्य खरेदासाठी लाखो रुपयांचें कर्ज
शहरामध्ये 230 हून अधिक जणांनी डीजेचे साहित्य खरेदी केले आहे. यासाठी विविध बँकांमधून लाखो रुपये कर्ज काढले आहे. कर्ज काढून आम्ही व्यवसाय करत आहे. आमच्या व्यवसायावर अनेकजण जीवन जगत आहेत. अनेकांना काम देत आहे. असे असताना आमच्यावरच का अन्याय? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. हिंदू सणांवर अशाप्रकारे दबाव घातला जात आहे. त्यामुळे राजकीय व्यक्ती का शांत आहेत?, निवडणुकीवेळी मात्र आम्ही हिंदू आहे, आम्हाला मतदान करा, असे सांगतात. ते जर आम्हाला सहकार्य करत नसतील तर यांना आम्ही का सहकार्य करायचे? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा. कोणत्याही परिस्थितीत आम्ही डीजे लावणार आहे. दोन बेस, दोन टॉप यानुसारच आम्ही काम करणार आहे. जर यापेक्षा अधिक कोणीही बेस किंवा टॉप लावत असतील तर त्याच्यावर कारवाई करावी. मात्र नियमानुसार काम करत असताना पोलीस प्रशासनाने त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असेही यावेळी सुनावण्यात आले आहे.
राज्योत्सव, वाल्मिकी जयंती, क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा जयंती, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्व वेळी एकच नियम लागू करावेत. अन्यथा केवळ गणेशोत्सव काळात दबाव वापरायचा आणि इतरवेळी मुभा द्यायची, हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी सेपेटरी प्रवीण प्रभू, खजिनदार स्वरुपराज बाडीवाले, सुहास चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.