Tarun Bharat

पी. ए. सूर्यवंशी यांचा आदर्श सवांनी घ्यावा

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांचे प्रतिपादन : सूर्यवंशी याच्या अमृत महोत्सवानिमित्त शानदार गौरव

प्रतिनिधी /पेडणे

पी. ए .सूर्यवंशी हे खऱया अर्थाने फार मोठय़ा परंपरेचे पाईक आहेत. जातपात , धर्म यांच्यापलिकडे जाऊन त्यांचे कार्य आहे.   त्यांचा परिस्पर्श  इतरांना झाल्यास  खऱया अर्थाने त्यांच्या जीवनातही सूर्याचा प्रकाश पडणार आहे. त्यांच्या समाजसेवा कार्याचा आदर्श  आदर्श समाजील इतर घटकांनी घ्यावा असे प्रतिपादन  माजी केंद्रीय कायदामंञी अ?ड.रमाकांत खलप यांनी पेडणे येथे केले.

गोव्यातील सुप्रसिध्द चित्रकार आणि लोकविश्वास प्रति÷ान ढवळी – फोंडा येथील विशेष मुलांच्या विद्यालयासाठी गेली चार दशके तन – मन- धन देऊन अविरत कार्यरत असलेले परशुराम अप्पाजी सूर्यवंशी उर्फ पी.ए. सूर्यवंशी यांच्या आमृत  महोत्सवी वर्षा ’ निमित्ताने  गौरव समारंभाचे आयोजन पेडणे शेतकरी सोसायटी सभागृहात फुले शाहू आंबेडकर प्रति÷ान पेडणे , नवचेतना युवक संघ पेडणे  व आदर्शनगर सोसायटी पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने  अ?ड. रमाकांत खलप बोलत होते.

   यावेळी व्यासपीठावर पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर,  लोकविश्वास प्रति÷ान ढवळीचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर, प्रसिद्ध चित्रकार पी.ए सूर्यवंशी,  सौ . कला सूर्यवंशी,पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई,चांदेल – हसापुर ग्रामपंचायतचे माजी   सरपंच तथा समाजसेवक तुळशीदास गवस, डॉ.देविदास शिरोडकर, उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेविका   उषा नागवेकर,  नगरसेविका अश्विनी पालयेकर, नगरसेविका   शिवराम तुकोजी,  नगरसेविका राखी कशालकर,  डॉ. राहुल सूर्यवंशी, आदर्श नगर सोसायटीचे अध्यक्ष सुधीर कुबडे, फुले – शाहू – आंबेडकर प्रति÷ानचे अध्यक्ष महादेव गवंडी, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर , क्रीडा शिक्षक किशोर किनळेकर  आदी  उपस्थित होते.

डॉ. देविदास शिरोडकर यांनी बोलताना सांगितले की, पी.ए सूर्यवंशी यांनी चित्रकला क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी जादूच्या कलेचा उपयोग समाजासाठी करून एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. सेवाभावी मनाने ते सदैव कार्यरत असतात. चेहऱयावर स्मितहास्य ठेवून एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल असा जोश त्यांचा ह्या वयात आहे.

यावेळी बोलताना   अनुप प्रियोळकर म्हणाले की, पी.ए सूर्यवंशी यांचं लोकविश्वास प्रति÷ानसाठी कार्य खूप मोठ आहे. आपण जगत असताना दुसऱयांना जगणं आपलं कर्तव्य आहे या नात्याने सूर्यवंशी यांचं कार्य आहे. ठिकठिकाणी जादूचे प्रयोग, टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्माण करून त्यांना जे मानधन मिळाले ते सर्व त्यांनी लोकविश्वास प्रति÷ानसाठी दिलेले आहे. लोकविश्वास प्रति÷ानचा इतिहास जर लिहायचा झाला तर तो पी.ए सूर्यवंशी सर यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच राहील.

या कार्यक्रमात कला सूर्यवंशी (निवृत शिक्षिका ), तुळशीदास गवस (सरपंच- चांदेल हसापुर पंचायत) उषा रुदेश नागवेकर (नगरसेविका), विशाखा विश्राम गडेकर (नगरसेविका) , प्रकाश तळवणेकर (पत्रकार), निवृत्ती शिरोडकर (पत्रकार), मकबूल माळगीमनी (पत्रकार), राजेंद्र केरकर (पर्यावरण तज्ञ), प्रवीण उत्तम कोटकर (अध्यक्ष, भगवती हायस्कूल), शिवराम तुकोजी (नगरसेवक), डॉ.राहुल सूर्यवंशी,डॉ. अमिता सूर्यवंशी, संतोष मळीक, ओंकार गोवेकर, महादेव गवंडी, नरहरी पेडणेकर, विठोबा बगळी, डॉ.अमिता सूर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना  तुळशीदास गवस म्हणाले , सुप्रसिद्ध चिञकार पी.ए.सूर्यवंशी यांचा अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने त्यांच्या कार्यांची दखल घेऊन फुले शाहू आंबेडकर प्रति÷ान पेडणे   नवचेतना युवक संघ व आदर्श नगर सैसायटी यांनी केला गौरव हे मोठे कार्य आहे. यापूर्वी गोवा राज्याबाहेर जाऊन त्यांनी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया व्यक्तीचा गौरव केला आहे.त्याबद्दल दोन्ही संस्था अभिनंदन केले.  

 यावेळी  माधव सीनाई देसाई, निवृत्ती शिरोडकर यांनी आपली मनोगते व्यक्त करत पी.ए. सूर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या.

  सुरुवातीला सुरेखा किनळेकर यांनी स्वागत नृत्य सादर केले.स्वागत व प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. महादेव गवंडी यांनी मान्यवरांचा परिचय केला. शांती किनळेकर, प्रतीक्षा साळगावकर, पूजा नारोजी यांनी पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ओंकार गोवेकर यांनी केले तर गौरेश पेडणेकर यांनी आभार मानले.

Related Stories

शिरवाडकर यांच्या ‘वीज म्हणाली धरतीला’वर चर्चा

Amit Kulkarni

पणजीत 19 व 20 रोजी नाटय़संगीत सोहळा

Omkar B

ब्रह्मेशानंदाचार्यांना ‘विश्व शांती’ पुरस्कार प्रदान

Omkar B

कोरोनामुळे दिवसभरात 11 जणांना मृत्यू

Patil_p

हसापूर येथे शिवजन्मोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

गणरायाच्या स्वागतासाठी सत्तरातीत जय्यत तयारी बाजारपेठ सजली

Patil_p