Tarun Bharat

शिवसेनेकडून ऑफर आल्यास विचार करू

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे : ‘हर घर तिरंगा’चे स्वागत : ‘हर घर संविधान’ मोहीमही राबवा

प्रतिनिधी/कोल्हापूर

शिवसेनेकडून आगामी काळातील निवडणुकांच्या संदर्भात जर सकारात्मक ऑफर आली तर आमचा पक्ष जरूर विचार करेल, असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे.

प्रा. कवाडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी नुकतीच ‘मातोश्रा’rवर जावून भेट घेतली होती. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, प्रा. कवाडे म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आमचा जुना स्नेह आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. तेथे राजकीय चर्चा झाली नाही. मात्र राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता आगामी काळात शिवसेनेने जर आमच्या पक्षाबरोबर युती, आघाडी करण्याबाबत सकारात्मक ऑफर दिली, शब्द दिला तर आमच्या पक्षाची सांसदीय समिती त्याबाबत विचार करेल. या पत्रकार परिषदेला अनिल म्हमाणे, डॉ. नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, सनी गोंधळी आदी उपस्थित होते.

हर घर तिरंगा बरोबर हर घर संविधान मोहीम राबवा
प्रा. कवाडे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून केंद्र सरकारने राबविलेल्या हर घर तिरंगा मोहिमेचे स्वागत केले. ते म्हणाले, आजपर्यंत आपल्या कार्यालयावर तिरंगा ज्या फडकविला नाही, ते आता तिरंगा ध्वजाला मानत आहेत, हे चांगले आहे. आता त्यांनी हर घर तिरंगा अभियानाबरोबर हर घर संविधान मोहीमही राबवावी.

कोल्हापूरचे नाव राजर्षी शाहू महाराज जिल्हा करा
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे आज कोल्हापूर जिल्हय़ाचा विकास झाला आहे. त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वापासून आपल्या सर्वांना कायम उर्जा मिळते. त्यामुळे त्यांच्या स्मरण म्हणून कोल्हापूर जिल्हय़ाचे नाव राजर्षी शाहू महाराज जिल्हा असे करण्यात यावे, अशी मागणी प्रा. कवाडे यांनी केली.

Related Stories

अभिनंदन…पण इतक्यावर थांबू नये

Archana Banage

कोल्हापूर : तावडे हॉटेल महामार्ग वाहतूक सुरु

Archana Banage

अंबाबाईच्या नवरूपांची परंपरा आजही कायम

Archana Banage

जम्मूचे पोलीस अधीक्षक श्रीधर पाटील यांचा कोल्हापुरी बाणा

Archana Banage

Photo : काल आजोबा पडले, रात्री पट्टे मारले सकाळी पट्टे गायब, कोल्हापुरात स्प्रीड बेकरच्या पट्ट्यांची रंगली चर्चा

Archana Banage

शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अजित नरदे यांचे निधन

Archana Banage