अमेरिकेचा सर्वाधिक पुढाकार, ब्रिटन-फ्रान्सचेही महत्वाचे योगदान
लवकरच युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला 2 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. अद्यापही रशियाला या छोटय़ा देशावर निर्णायक वर्चस्व मिळवता आलेले नाही. त्यामुळे रशियाचा मोठाच अपेक्षाभंग झाला आहे. युद्ध सुरु झाल्यापासून 8 10 दिवसांमध्ये युक्रेनला पादाक्रांत करण्याचे रशियाचे स्वप्न भंगले आहे. युक्रेनला अनेक देशांनी पुरविलेली घातक शस्त्रे, हे याचे कारण आहे.
रशियन सैनिक आणि रशियाची युद्ध विमाने यांच्याशी संघर्ष करण्यासाठी अमेरिका आणि इतर युरोपियन देशांनी अत्यंत आधुनिक आणि प्रभावशाली शस्त्रे तसेच क्षेपणास्त्रे दिली आहेत. त्यामुळे युक्रेनने रशियाचा चिवट प्रतिकार चालविला आहे. युक्रेनमध्ये सैन्य घुसवूनही रशियाला या देशावर निर्णायक घाव घालणे अद्याप जमलेले नाही. रशियाचे शेकडो सैनिक ठार झाले आहेत, तर अनेक रणगाडे आणि युद्धविमाने युक्रेनने या शस्त्रांच्या साहाय्याने निकामी केली आहेत. त्यामुळे रशियाचे आक्रमण रोखले गेले नसले तरी ते बऱयाच अंशी मंदावले आहे. तसेच रशियाची हानीही या युद्धात अतिशय मोठय़ा प्रमाणात झाली आहे.
अमेरिकेचा पुढाकार
युक्रेनला शस्त्रे पुरविण्यात अमेरिकेने अर्थातच पुढाकार घेतला आहे. हातघाईच्या युद्धात अमेरिकेचे सर्वात घातक मानले जाणारे पोर्टेबल अँटीटँक मिसाईल (हलके रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र या युद्धात अतिशय परिणामकारक ठरले आहे. ते एमएफजी-148 जॅव्हलीन या नावाने ओळखले जाते. ते गडद अंधारातही अचूक आघात करते. एक सैनिकही ते क्रियान्वित करु शकतो. याशिवाय अमेरिकेने लढाऊ ड्रोन्स दिली आहेत. ती रशियाच्या विमानांवर हल्ले चढवत आहेत. अमेरिकेने एम आय 17 हे हेलिकॉप्टर्सही युक्रेनला दिली आहेत.
याशिवाय बळकट हॅमर ट्रक आणि गाडय़ा, विमानविरोधी रडार यंत्रणा, तसेच गस्त घालणाऱया अत्याधुनिक नौका, लढाऊ नौका, स्वयंचलित बाँबर्स, खांद्यावरुन डागता येणारी क्षेपणास्त्रे, मालवाहू विमाने आणि गस्त घालणाऱया चिलखती गाडय़ा अशी बरीच मोठी शस्त्रसामग्री अमेरिकेने युपेनला युद्धापूर्वीच दिला आहे.
रशियाचीच विमानविरोधी यंत्रणा
स्लोव्हाकिया या एकेकाळच्या रशियाच्याच प्रभावाखाली असणाऱया देशाने युक्रेनला रशियातच विकसीत झालेली विमान विरोधी यंत्रणा दिली आहे. ती एस-300 या नावाने ओळखली जाते. या यंत्रणेद्वारे 100 किलोमीटर अंतरावरुन लक्ष्यभेद केला जाऊ शकतो. रशियाच्या विमान हल्ल्यापासून संरक्षण देण्यास ती सक्षम आहे.
ब्रिटनची क्षेपणास्त्रे
ब्रिटननेही युक्रेनला रशियाच्या रणगाडय़ांपासून संरक्षण करणारी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे दिली आहेत. ती एनएलइडब्यू या नावाने ओळखली जातात. ती 800 मीटर अंतरावरुन अचूक निशाणा साधतात. त्यामुळे युक्रेनकडून रशियाचे अनेक रणगाडे निकामी करण्यात आलेले आहेत. ब्रिटनने अशी 3000 क्षेपणास्त्र पुरविली असून त्यांच्यामुळे रशियाच्या रणगाडा युद्धाची व्याप्ती संकुचित झाली आहे.
जर्मनीकडून चिलखती गाडय़ा
जर्मनीने 80 चिलखती गाडय़ा पुरविल्या आहेत. या गाडय़ांचा उपयोग अग्निबाण डागण्यासाठी आणि गोळय़ांच्या फैरी झाडण्यासाठी केला जातो. त्यांचा वेग अफाट आहे. त्यामुळे त्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येत नाहीत. याशिवाय जर्मनीने 50 रुग्णवाहिका दिल्या असून त्या जखमी सैनिकांसाठी उपयुक्त ठरत आहेत.
हॉलंडकडून शस्त्रसामग्री
हॉलंड या प्रगत देशाने 400 रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे, 200 विमानविरोधी स्टींगर क्षेपणास्त्रे, 100 स्नायपर रायफल्स, रात्री दिसू शकणारे चष्मे इत्यादी साधने दिली असून ती युक्रेनच्या संघर्षात महत्वाची भूमिका साकारत आहेत.