बेंगळूर/प्रतिनिधी
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) संपूर्ण कर्नाटक राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून उत्तर अंतर्गत कर्नाटकात १३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. दरम्यान, “या काळात या भागातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल,” असे अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील किनारपट्टी भागात कमाल तापमान सुमारे २८ अंश सेल्सिअस झाल्याने पाऊस पडण्यास मदत होणार आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात किमान तापमान २२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.