Tarun Bharat

भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत

Advertisements

पुणे : पिवळ्या धम्मक पायवाटेवर सोनपावलांचे ठसे उमटवित संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रविवारी जेजुरीत दाखल झाली. यावेळी भांडारा आणि खोबऱ्याची उधळण करत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा गजर करण्यात आला.

सासवडमधील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून माउलींचा पालखी सोहळा रविवारी सकाळी मार्गस्थ झाला. सासवडपासून दहा मैलांच्या अंतरावर खंडोबारायाची जेजुरी आहे. जेजुरीच्या दिशेने वारकरी चालू लागले. कऱ्हा नदीचा पूल ओलांडल्यानंतर बोरावके मळा येथे पालखीने पहिला विसावा घेतला. यमाई शिवरी येथे दुपारचे भोजन झाले. दुपारी पालखी पुन्हा वाटेला लागली. तसा वारकऱ्यांचा उत्साह दुणावला.

टाळ मृदंगाचा गजर, अभंगाचा नाद घुमू लागला. ऊन, सावलीचा खेळ सुरूच होता. सायंकाळच्या सुमारास पालखी मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीत पोहोचली अन् जेजुरीकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. भंडारा व खोबरे उधळून पालखी सोहळय़ाचे स्वागत करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार.. असा जयघोष झाला. त्यानंतर पालखी मुक्कामी विसावली. सोमवारी सकाळी सहा वाजता पालखी वाल्हे येथे मार्गस्थ होणार आहे.  

Related Stories

महाबळेश्वर पालिकेचे बांधकाम रखडले

Patil_p

गुरुजींची शाळा बंद सर्व्हे सुरू

Patil_p

ठाण्यातून एका संशयित दहशतवाद्याला अटक

Abhijeet Shinde

राज्यात कोरोनाचे 503 बळी; 68 हजार 631 नवे बाधित

Abhijeet Shinde

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस अतिवृष्टीचा इशारा

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल – नाना पटोले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!