साधना मासिकाचे प्रकाशन
प्रतिनिधी / बेळगाव
केएलएस गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयातर्फे वाणिज्य व विज्ञान शाखेच्या नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व साधना मासिकाचे प्रकाशन मोठय़ा उत्साहात करण्यात आले.
केएलएस गोगटे वेणूगोपाल सभागृहात आयोजित या स्वागत समारंभ व मासिक प्रकाशनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमाची माहिती, प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचाऱयांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील मुबलक सुविधा, बस, लायबरी, मैदान, ग्रंथालय, लेक्चर हॉल याबद्दलची माहिते देण्यात आली.
प्रमुख वक्ते म्हणून जीएसएस महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एन. डी. हेगडे, चार्टर्ड अकाऊंटंट व माजी विद्यार्थी नितीन निंबाळकर यांनी यावेळी नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत माहिती सांगून त्याबद्दलच्या सोयी सवलती व फायदे पटवून देऊन मार्गदर्शन केले. दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा खास सत्कार यावेळी करण्यात आला. 2020-21 च्या मासिक ‘साधना’ चे प्रकाशन करण्यात आले.
स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्राचार्य डॉ. ए. एस. केरूर व प्रा. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर आसावरी पाटील यांनी आभार मानले. यावेळी पदवीपूर्व महाविद्यालयाचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी व नवीन विद्यार्थी उपस्थित होते.