वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड
‘सामनावीर’ केमर रोशच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यजमान विंडीज संघाने पहिल्या कसोटीतील खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा 7 गडय़ांनी पराभव करत या मालिकेत विजयी सलामी दिली. या सामन्यात रोशने 74 धावांत 7 गडी बाद केले.
या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 103 धावा जमविल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 265 धावा जमवित 162 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर बांगलादेशने दुसऱया डावात बऱयापैकी फलंदाजी केली. त्यांचा दुसरा डाव 90.5 षटकांत 245 धावांत आटोपला. विंडीजला निर्णायक विजयासाठी 84 धावांची जरूरी होती. बांगलादेशच्या दुसऱया डावात कर्णधार शकीब अल हसनने 63 तर नुरूल हसनने 64, मेहमुदुल हसनने 42, तमीम इक्बालने 22 धावा जमविल्या. विंडीजच्या रोशने 53 धावांत 5, जोसेफने 3 आणि मेयर्सने 2 गडी बाद केले. त्यानंतर विंडीजने खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर दुसऱया डावात 3 बाद 49 धावा जमविल्या होत्या. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी त्यांना विजयासाठी केवळ 35 धावांची जरूरी होती. विंडीजने 22 षटकांत 3 बाद 88 धावा जमवित बांगलादेशचा 5 गडय़ांनी पराभव केला. विंडीजच्या दुसऱया डावात जॉन कँपबेलने 67 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 58 तर ब्लॅकवूडने 53 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प.डाव- 32.5 षटकांत सर्वबाद 103, विंडीज प. डाव 112.5 षटकांत सर्वबाद 265, बांगलादेश दु.डाव 90.5 षटकांत सर्वबाद 245 (शकीब अल हसन 63, नुरूल हासन 64, मेहमुदुल हसन 42, तमीम इक्बाल 22, रोश 5-53), विंडीज दु. डाव- 22 षटकांत 3 बाद 88 (कँपबेल नाबाद 58, ब्लॅकवूड नाबाद 26, खलीद अहमद 3-27).