Tarun Bharat

‘सिटाडेल’साठी समांथाने कसली कंबर

हिंदीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी घेतेय प्रशिक्षण

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू देशातील सर्वात चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. द फॅमिली मॅन 2 मधील तिच्या अभिनयाला मोठी दाद मिळाली आहे. याचबरोबर पुष्पा चित्रपटातील तिच्या नृत्याचे कौतुक झाले आहे. समांथा सध्या स्वतःचे पूर्ण लक्ष आगामी प्रोजेक्टवर केंद्रीत करून आहे. यापैकी एक आहे ‘सिटाडेल’ सीरिज. याकरता तिने कंबर कसली असली असून सध्या हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी रितसर प्रशिक्षण घेत आहे.

समांथाने ‘सिटाडेल’ आणि अन्य आगामी प्रोजेक्टसाठी हिंदीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री प्रतिष्ठित प्रशिक्षकाकडून याचे शिक्षण घेत आहे. या प्रशिक्षकाने यापूर्वी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना प्रशिक्षण दिलेले आहे. आगामी काळात समांथा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून येऊ शकते. याचीच तयारी म्हणून हिंदी भाषा आत्मसात करण्याचे प्रयत्न तिने चालविले आहेत.

अमेरिकन सीरिज ‘सिटाडेल’मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिसून येणार आहे. तर याच्या इंडियन स्पिन-ऑफमध्ये समांथा रुथ प्रभू आणि वरुण धवन हे कलाकार दिसून येणार आहेत. या प्रोजेक्टचे दिग्दर्शन राज अँड डीके करणार आहेत. समांथा सध्या अमेरिकेत असून सीरिजसाठी आवश्यक प्रशिक्षण घेत आहे.

‘सिटाडेल’मधील स्वतःच्या व्यक्तिरेखेनुसार समांथा तयारी करत आहे. सिटाडेलसह समांथा ‘शांकुतलम’मध्ये समांथा दिसून येणार आहे. तसेच ‘खुशी’ आणि ‘यशोदा’ चित्रपटातही ती काम करत आहे. सिटाडेल ही सायन्स फिक्शन स्पाय सीरिज असून ती अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

Related Stories

‘गांधी गोडसे एक युद्ध’ 26 जानेवारीला झळकणार

Patil_p

सोन्याच्या गाऊनमध्ये नटली उर्वशी

Patil_p

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

Archana Banage

काश्मिर फाईल्सचे सत्य लोकांच्या गळ्यात काट्या सारखा रुतला- अनुपम खेर

Abhijeet Khandekar

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन

Tousif Mujawar

‘गणपत’मध्ये एली अवरामची एंट्री

Amit Kulkarni