Tarun Bharat

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे काय आहेत फायदे;चला जाणून घेऊया…


कोल्हापूर प्रतिनिधी:

👉रक्ताभिसरण सुधारते
जेव्हा आपण थंड पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपले रक्ताभिसरण वाढते. आपले शरीर वाढलेले तापमान कमी करून ते तापमान संतुलित करण्यासाठी वेगाने काम करते. थंड पाण्यामुळे आपल्या हृदयाची गती वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

👉चमकणारी त्वचा आणि केस
गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते. पण थंड पाण्याची आंघोळी मुळे तुमच्या त्वचेची रंध्रे आकुंचन पावतात आणि केसांना घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते. याचप्रमाणे त्वचेची जळजळ कमी होऊन आणि मुरुमांच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

👉चांगली झोप
थंड पाण्याने अंघोळ केल्याने झोप चांगली लागते. तसेच तुमच्या झोपेचे विकार बरे होऊ शकतात. म्हणूनच तुम्हाला लवकर आराम आणि शांत वाटायचे असेल तर झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची डॉक्टर आणि तज्ञांनी शिफारस केली आहे.

👉वजन कमी करते ,तणाव कमी करते
थंड पाण्याने आंघोळ करण्यामुळे तुमच्या कॅलरीज लवकर बर्न होतात. तुमची उर्जा पातळी वाढवते ज्यामुळे शेवटी वजन कमी होते. थंड पाण्याची आंघोळ तणाव कमी करतात. यामुळे तुमचा तणाव लवकर दूर होतो आणि नैराश्यही कमी होते. तसेच आळस आणि थकवा देखील नाहीसा करते. त्यामुळे फक्त थंड पाण्याने अंघोळ करणे फायद्याचे मानले जाते.

Related Stories

साताऱयातील तेराशे कामगारांसह रेल्वे रवाना

Patil_p

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी त्वरीत ऑनलाईन नोंदणी करावी

Archana Banage

कोल्हापूरची पंचगंगा २५ फुटांवर, मुख्यमंत्र्यांकडून एनडीआरएफला सज्ज ठेवण्याचे आदेश

Rahul Gadkar

‘स्वाभिमानी’च्या वतीने अलमट्टीच्या वाढणाऱ्य़ा उंचीस विरोध; आंदोलनाचा इशारा

Abhijeet Khandekar

मळणी यंत्रात हात अडकून शेतकरी गंभीर जखमी

Abhijeet Khandekar

पॉझिटिव्हीटी कमी – आता ‘जबाबदारी सातारकरांची’

Patil_p