Tarun Bharat

5 जी सोडा राव ‘6 जी’ येतंय..

जग अजूनही 5 जी नेटवर्कची वाट पाहत आहे. ते आता लाँच होण्याच्या उंबरठयावर आहे. परंतु 6 जी नेटवर्कची चाहूल याआधीच लागली आहे. 5 जी पेक्षा 6 जी नेटवर्क किती वेगवान असेल ? ते कधी येईल जाणून घ्या 11 मे जागतीक तंत्रज्ञान दिवसाच्या पार्श्वभूमीवर.

5 जी तर सोडाच पण सध्या 6 जीचा खूप बोलबाला आहे. काही संशोधन गटांनीही त्यावर संशोधन सुरू केले आहे. आणि त्यांना विश्वास आहे की येत्या 10 वर्षात म्हणजेच 2030 च्या आत 6 जी देखील आपल्यासमोर असेल.

Advertisements

6 जी शी संबंधित खास गोष्टी

असे मानले जाते की 6 जी तंत्रज्ञानातील इंटरनेटचा वेग 5 जी तंत्रज्ञानापेक्षा 50 पट जास्त असेल. त्याचा वेग 1000 मेगाबाइट प्रति सेकंद असेल असा अंदाज आहे. त्यामुळे 6 जी मध्ये तुम्ही चक्क 51 सेकंदात आवडती फिल्म डाऊनलोड करू शकता. म्हणजे जे काम 5 जी करू शकत नाही, ते काम 6 जी अगदी आरामात करेल.

6 जी म्हणजे काय ?

6 जी चे पूर्ण रूप 6 जनरेशन कम्युनिकेशन आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे नेटवर्कशी एकाचवेळी काम करण्याची क्षमता असेल. 6 जी नेटवर्क ऑटोमेशनसाठी सक्षम आहे. ज्याव्दारे अनेक कामे ऍटोमॅटीक पध्दतीने करता येतील. ऐवढच नाही तर याव्दारे एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापरही होणार आहे. 6 जीव्दारे एकाच वेळी हजारो वायरलेस कनेक्शन्सवर होल्ड ठेवणे शक्य आहे.

स्मार्टफोन कंपन्यांची तयारी सुरू

मित्रांनो, LG, Samsung सारख्या सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी आपली मोर्चे बांधणी 6 जी च्या दिशेने सुरू केली आहे. चीनबरोबरच जपान, दक्षिण कोरिया यांच्यासह इतर देशही लवकरात लवकर 6 जी नेटवर्क सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या तंत्रज्ञानामध्ये डेटा ट्रान्सफरचा वेग, ऊर्जेची बचत, उच्च कनेक्शन घनता अशा अनेक सुधारणा पाहायला मिळतील.

आज आपण 11 मे जागतिक तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने पाहिले 6 जी नेटवर्क किती वैशिष्ठयपूर्ण असेल आणि ते कधी लाँच होईल. 6 जी चा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा भेटूया नव्या व्हिडीओंसह तोपर्यंत नमस्कार.

Related Stories

बीडच्या दाम्पत्याची अमेरिकेत चाकूने भोसकून हत्या

datta jadhav

अमेरिकेत : तिसरी लाट

Patil_p

कोरोना संसर्गाच्या तिसऱया लाटेची भीती

Patil_p

शांततेसाठी पुढाकार घेतलेल्या उद्योजकावर विषप्रयोग

Patil_p

कोरोना संक्रमणाचा मेंदूवरही परिणाम

Patil_p

युक्रेनमध्ये सैन्यविमान कोसळले

Patil_p
error: Content is protected !!