Tarun Bharat

‘मंकीपॉक्स’ नेमका आहे तरी काय?जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपचार

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

कोरोनानंतर आता जगभरात मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण वाढत आहेत. युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनसह एकूण 12 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 92 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरीचा इशारा दिला आहे. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नसला तरीही इतर देशांमधील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागानेही सर्व राज्यांना अलर्ट केलं आहे. त्यानंतर राज्याचा आरोग्य विभाग मंकीपॉक्सबाबत सतर्क होताना दिसत आहे.

मंकीपॉक्स हा आजार नेमका काय?

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग असून, त्याचे चिकिस्तिय सादरीकरण देवी रोगासारखे आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळं होतो त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार आहे, असं आपण म्हणू शकतो. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो.

मंकीपॉक्सची लक्षणे कोणती?

ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जी सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थकवा किंवा त्वचारोग ही या रोगाची लक्षणे आहेत. संक्रमित रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱयावर पुरळ येतात. रुग्ण बरा झाल्यावर हे पुरळाचे डाग तसेच राहतात. या विषाणूचा शरीतात प्रवेश झाल्यापासून ते प्रत्यक्ष लक्षणे दिसण्याचा कालावधी साधारणतः 7-14 दिवसांचा असतो. पुरळ दिसण्याच्या 1-2 दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग प्रसारित करू शकतो. तसेच पुरळांची सर्व खपली जाईपर्यंत संसर्ग राहू शकतो. लहान मुलांमध्ये या विषाणूची लक्षणे तीव्रतेने आढतात.

मंकीपॉक्सचा संसर्ग कसा होतो?

मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्वचा, श्वसनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे हा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. प्राण्यांमार्फतही हा विषाणू पसरतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

कुठे आढळतो हा विषाणू?

प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात हा विषाणू आढळतो. बेनिन, कॅमेरून, मध्य आफ्रिका, काँगो, गॅबॉन, घाना, आयव्हरी कोस्ट, लायबेरिया, नायजेरिया, काँगोचे प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये प्रामुख्याने प्राण्यांमध्ये मंकीपॉक्स हा आजार आढळतो. मात्र, आता इतर प्रदेशांमध्ये तो मानवामध्ये प्रसारित होत आहे. आतापर्यंत युरोप, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन यासह एकूण 12 देशात या विषाणूचे 92 रुग्ण आढळून आले आहेत.

काय खबरदारी घ्यावी?

या विषाणूचे संक्रमण प्रामुख्याने श्वसनामुळे आणि त्वचेच्या संपर्कामुळे होते. त्यामुळे संक्रमित रुग्णाच्या शरीरातील द्रव किंवा घाव सामग्रीचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा. त्याच्या दूषित बिछान्याद्वारे आणि कपडय़ांच्या माध्यमातूनही या आजाराचे संक्रमण होऊ शकते, त्यामुळे त्याचाही स्पर्श टाळावा. प्राण्यांमध्ये या विषाणूचा प्रसार वाढला तर प्राण्यांच्या दीर्घकाळ जवळ राहू नये. तसेच त्यांचे मांसही खाणे बंद करावे.

मंकीपॉक्सवर उपचार काय?

मंकीपॉक्सवर अद्याप कोणताही सुरक्षित आणि सिद्ध उपचार नाही. परंतु हा आजार रोखण्यासाठी स्मॉल पॉक्स वॅक्सिन, अँटीव्हायरल आणि व्हीआयजी यांचा वापर केला जाऊ शकतो. स्मॉल पॉक्स लस मंकीपॉक्स रोखण्यासाठी 85 टक्के प्रभावी ठरली आहे. अशा रुग्णांनी पुरेशा प्रमाणात आहार घ्यावा, तसेच शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी.

Related Stories

विमान क्षेत्राला बसणार 21 हजार कोटींचा फटका

datta jadhav

महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार

datta jadhav

वेळणेश्वरच्या समुद्रात नौका बुडाली; पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे तिघांना वाचवण्यात यश

Archana Banage

एक-दोन दिवसांत मला अटक होऊ शकते; सीबीआयच्या छाप्यानंतर सिसोदियांची पहिली प्रतिक्रिया

Archana Banage

प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री

Omkar B

विरार रुग्णालय दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त; सखोल तपासाचे आदेश

Tousif Mujawar
error: Content is protected !!