Tarun Bharat

पीसीओडी लक्षणे आणि उपाय…

पीसीओडी हा आजार हार्मोनल balance राखता नाही आला की होतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे म्हणजेच हार्मोनल इमबॅलेन्समुळे महिलांच्या अंडाशयात लहान लहान गाठी तयार होतात. ज्यामुळे महिलांचा अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो आणि गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवतात. Polycystic Ovarian Disease (PCOD) हा आजार Polycystic Ovary syndrome (PCOS) म्हणूनही ओळखला जातो.

आजकाल सुमारे ५-१० टक्के तरुण स्त्रिया या समस्येने त्रस्त असून, गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण करतात. पीसीओडीएसग्रस्त महिलांना अनियमित मासिक पाळी, केसांची असामान्य वाढ, मुरुमं तसेच ओवेरीयन सीस्ट म्हणजे गर्भाशयात गाठ येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

तरुणी आणि महिलांमध्ये आजकाल पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमची समस्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. पीसीओडीमध्ये अनियमित मासिक पाळी, स्थूलपणा, चेहऱ्यावर पुरुषी प्रकारची लव, केसांची वाढ अशी लक्षणे आढळतात. सौंदर्याच्या कारणास्तव का होईना, डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. चेहऱ्यावर, मानेवर केस वाढण्याची समस्या महिलांना निराशेच्या गर्तेत ढकलते.

पीसीओडीची लक्षणे :
चेहऱ्यावर डाग
अनावश्यक केस येणे
जाडी वाढणे
हार्मोनल असंतुलन, केस गळणे
मासिक पाळी अनियमित असह्य वेदना होणे, वंध्यत्व
चिडचीड वाढणे, रडू येणे
सहनशक्ती कमी होणे

या समस्येचे नेमके कारण…
डॉक्टरांच्या मते अनियमित जीवनशैलीचा हा परिणाम असल्यानं हा आजार होतो. रात्री उशिरापर्यंत जागणे, धूम्रपान, मद्यपान करणे, जास्त ताणतणाव इत्यादी कारणांमुळे पीसीओडी होऊ शकतो. कधीकधी ही समस्या आनुवंशिकतेमुळे देखील होण्याची शक्यता असते.

पीसीओडीवर उपाय:
पीसीओडी हा आजार बरा होऊ शकतो. यासाठी जीवनशैलीत सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. हाय फॅट पदार्थ टाळा. दररोज एक तास नियमित व्यायाम करा. यामुळे वजन नियंत्रित राहील. डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच काही औषधे दिली असतील तर, ती वेळेवर घ्या.

PCOD आणि pregnancy वर उपचार
वजन कमी केल्याने काही प्रमाणात पीसीओडी ची लक्षणे कमी होऊ शकतात. तसेच, कुटुंब नियोजन आणि अँटी-एंड्रोजनच्या गोळ्या घेतल्याने पीसीओडीच्या लक्षणांमध्ये सुधारणा येऊ शकतात

दररोज नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.

गर्भाशयची समस्या असल्यास, तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांचे सेवन करू शकता. प्रजननासाठी काही निवडक इस्ट्रोजेन रिसेप्टर मॉड्युलेटर औषधे उपलब्ध आहेत.

औषधांचे सेवन करूनदेखील जर गर्भधारणा होत नसेल तर बीजांड सोडण्यासाठी फर्टिलिटी इंजेक्शनची आवश्यकता लागते. फर्टिलिटी इंजेक्शन्समध्ये समप्रमाणात असणारी संप्रेरक, आपल्या मेंदूला गर्भाशयाला बीजांड बनविण्यासाठी सिग्नल देतात.

Related Stories

सुंदर आणि तेजस्वी चेहऱ्यासाठी घरच्या घरी करा फ्रुट फेशियल

Kalyani Amanagi

हिवाळ्याचा ‘आघात’

Omkar B

अंडर आर्म्सचा काळपटपणा घालवायचा असेल तर…हे उपाय करून बघा

Kalyani Amanagi

कॅलीसीमचे शोषण होण्यासाठी

Amit Kulkarni

बरे होऊनही चव ,वास येत नसल्यास

Amit Kulkarni

विकार मूत्राशयाचे

Omkar B
error: Content is protected !!