Tarun Bharat

व्हेल माशाची ‘उलटी’ म्हणजे काय?

उलटी गोळा करून आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री ; तस्करीचा गुढ प्रकार

प्रतिनिधी, सुधाकर काशीद
Whale Fish Vomit : बक्कळ पैसे मिळवण्यासाठी माणूस काय काय करेल याचा नेम नाही. व्हेल माशाने केलेली उलटी (अँबरग्रीस) गोळा करून त्याची विक्री हा देखील पैसा मिळवण्याचा एक विकृत प्रकार आहे. यासाठी माशाच्या उलटीची तस्करी केली जात आहे. विशाल असा समुद्र, त्यात एखाद्या व्हेल माशांनी केलेली उलटी, पाण्यावर तरंगत आलेली ही उलटी गोळा करून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची विक्री हा सारा प्रकार गुढ तर आहेच.पण पैसे मिळवण्यासाठी लोक कशाकशावर टपलेले असतात याचेही एक विकृत वास्तव आहे.

व्हेल मासा अतिशय खोल समुद्रात असतो. त्यातल्या ब्ल्यू व्हेलला देव मासा म्हणून ओळखला जाते. पूर्ण वाढ झालेला 40-50 फुटाहुन अधिक लांब व टनात वजनाचा असतो. हा मासा तसा खूप शांत प्रवृत्तीचा. तो खोल समुद्रात असल्याने अगदी क्वचित वेळाच तो नजरेला पडतो. किनाऱ्यावर हा मासा एक तर मृतावस्थेत येतो. किंवा जखमी अवस्थेत असला तरच दिसतो. एरव्ही व्हेल मासा किनाऱ्यांपासून लांब विशिष्ट खोली असलेल्या समुद्रातच वावरत असतो.

व्हेल सारख्या अवाढव्य माशाची शिकार हा तर गुन्हा आहेच.पण या माशाच्या कोणत्याही अवयवाचा व्यापारी वापर हा देखील गुन्हा आहे.त्यात या माशांनी केलेली उलटी जो गोळा करेल व विक्री करेल तो देखील गुन्हेगार ठरतो.वरवर ऐकायला हे खूप विचित्र वाटते.पण वास्तव तसेच आहे.हा मासा त्याच्या शारीरिक प्रक्रियेतून उलटी करतो.ती उलटी द्रव स्वरूपात पण पाण्यात विरघळणारी नसते.या उलटीला अंबर ग्रीस असे म्हटले जाते.त्याच्या न विरघळणाऱ्या द्रव स्वरूपामुळे या उलटीचा गठ्ठा तयार होतो.व तो पाण्यावर तरंगू लागतो.कधी कधी जाळ्यात अडकतो.किंवा किनाऱ्यापर्यंत तरंगत येतो.

सामान्य माणसासमोर किनाऱ्यांवर या उलटीचा गठ्ठा तरंगत येऊन पडला असला तरीही त्याचे वेगळेपण आपल्याला कळत नाही.पण काही लोकांची नजर अशा विकृतीकडेच असते.त्यामुळे ते लोक हा उलटीचा गठ्ठा या ना त्या मार्गाने मिळवतात.अत्तर निर्मितीत एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून व्हेल माशाच्या या उलटीचा वापर केला जातो असे सांगितले जाते.पण नेमके वास्तव कुणीही सांगू शकत नाही.उलटीचा हा गठ्ठा दोन कोटी रुपयाला विकला जातो असे सांगतात.पण इतकी रक्कम देऊन ही उलटी कोण विकत घेतो हे फारसे समोर आलेले नाही.वास्तविक उलटीची विक्री करणाऱ्या बरोबरच जो कोणी ही उलटी खरेदी करतो. लाखाच्या पटीत पैसे द्यायला तयार होतो.त्यांनाही कारवाईच्या फेऱ्यात घेण्याची गरज आहे. कारण व्हेल माशाची उलटी घेणाराच या उलटीचे पुढे काय होते? काय होणार आहे? हे स्पष्ट सांगू शकतो.

वन्यजीव कायद्यानुसार व्हेल माशाच्या उलटीची विक्री हा गंभीर गुन्हा आहे. वन्यजीवाच्या शेडय़ुल एकमध्ये या उलटीचाही समावेश आहे. जशी कोणत्याही वन्य जीवाचे कातडे, शिंग, नखे मांस विकता येत नाही तशी, व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे.
आर.आर. पाटील, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, रत्नागिरी.

Related Stories

झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाबरोबर विद्यापीठाचा सामंजस्य करार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्टसह चौघे पॉझिटिव्ह

Archana Banage

खबरदार ! अभयारण्यक्षेत्रात थर्टीफस्ट कराल तर……

Abhijeet Khandekar

चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आदेश होऊन वर्ष उलटले तरी `जैसे थे’च

Archana Banage

सदस्य नोंदणीत कोल्हापूर जिल्हा शिवसेना मागे का?

Archana Banage

कोल्हापूर : तीन आठवड्यानंतर `गो कोरोना’..!

Archana Banage