Tarun Bharat

या मुलीच्या निर्धाराला काय म्हणावे!

एक पायाने 1 किलोमीटर पायी चालत जाते शाळेत, जमुईमध्ये दुर्घटनेत गमवावा लागला होता पाय

बिहारच्या जमुई येथे राहणाऱया सीमाला मोठेपणी शिक्षिका व्हायचे आहे. तिच्या निर्धारासमोर संकटांनीही हार मानली आहे. एका पायाने एक किलोमीटर पायी चालत जात सीमा दररोज शाळेत पोहोचते आणि मन लावून अभ्यास करते. शिक्षिका होत स्वतःच्या आसपास असलेल्या लोकांना साक्षर करण्याचे तिचे स्वप्न आहे.

Advertisements

नक्षलप्रभावित फतेपूर गावात 10 वर्षीय सीमा राहते. 2 वर्षांपूर्वी एका दुर्घटनेत तिला एक पाय गमवावा लागला. या दुर्घटनेने तिचा एक पाय हिरावून घेतला असला तरीही तिचा निश्चय ढळलेला नाही. सीमा आता मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी एक उदाहरण ठरली आहे. ती एका पायाने चालत जात शाळेत पोहोचते.

सीमाचे वडिल मजूर

सीमाचे वडिल बिहारबाहेर राहून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सीमाला एका रस्ते दुर्घटनेत पाय गमवावा लागला होता. गावातील इतर मुलांना शाळेत जाताना पाहून सीमाला शाळेत जाण्याची इच्छा व्हायची. अशा स्थितीत सीमाने स्वतःहून शाळेत जात शिक्षण घेण्याची इच्छा स्वतःच्या आईसमोर व्यक्त केली होती. एका शिक्षकाने तिला शाळेत प्रवेश मिळवून दिला.

1 किमीची पायपीट

सीमा आता दररोज 1 किलोमीटरच्या पायवाटेवरून चालत जात शाळेत पोहोचते. एक पाय गमवावा लागल्याचे कुठलेच दुःख नाही, मी एका पायाने स्वतःची सर्व कामे करत असल्याचे सीमा सांगते. सीमाचा हा निर्धार पाहून ग्रामस्थ अवाप् होत आहेत.

Related Stories

एकात्मभक्ती

Patil_p

खनिज कायदा दुरुस्ती अध्यादेशाला मंजुरी

Patil_p

मृत्यू टाळायचा असेल तर परत जा – युक्रेन राष्ट्राध्यक्ष

Sumit Tambekar

मेक इन इंडियाला अमेझॉनचा हातभार

Patil_p

‘या’ मुख्यमंत्र्यांनी दिले बीजेपीला आव्हान;2024 मध्ये भाजपला रोखणार

Kalyani Amanagi

TMC नेत्याला भाजपच्या गुंडांकडून मारहाण

datta jadhav
error: Content is protected !!