वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्हॉट्सऍप पे इंडियाचे प्रमुख विनय चोलेटी यांनी राजीनामा दिला आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. चोलेटी यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
सुमारे दीड महिन्यात मेटा सोडणारे ते चौथे वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी कंपनीचे देशातील प्रमुख अजित मोहन यांनी नोव्हेंबरमध्ये कंपनी सोडली होती. मोहन यांच्यानंतर व्हॉट्सऍप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस आणि मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण प्रमुख राजीव अग्रवाल यांनीही गेल्या महिन्यात राजीनामा दिला आहे.
चोलेटी यांनी लिंक्डइनवर आपण व्हॉट्सऍप सोडल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले, ‘व्हॉट्सऍप पे चा आज माझा शेवटचा दिवस होता, मी कंपनी सोडली. मी अभिमानाने सांगू शकतो की भारतात व्हॉट्सऍपची व्यापकता वाढवण्यासाठी घेतलेले श्रम हे फळाला आल्याचे पाहून मी समाधानी आहे.