Tarun Bharat

शिकारीच जेव्हा शिकार होतो…

सापाने किडय़ाला गिळणे हा जगाचा सर्वसामान्य नियमच आहे. पण किडा गिळताना तो जीवंत राहणे आणि साप मरणे याला वृत्तपत्र शास्त्रात बातमी असे म्हणतात. अशीच एक ‘बातमी’ अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात नुकतीच घडली आहे. येथील एक अभयारण्य ‘जॉन पेनिकॅम्प क्लोरल रीफ स्टेट पार्क’ येथे संशोधकांना एक छोटय़ा आकाराचा पण दुर्मिळ साप मृतावस्थेत आढळला. हा साप अत्यंत विषारी आणि घातक म्हणून ओळखला जातो. वनांमधील मोठे प्राणीही त्याच्यापासून सावध आणि दूर असतात. असा साप मेलेला आढळल्यानंतर संशोधकांचे कुतुहल जागृत झाले. आणि त्यांनी मृत्यूचे कारण शोधण्याचे ठरविले. या प्रजातीचा साप गेल्या चार वर्षांत आढळलेला नव्हता. त्यामुळे ही प्रजाती नामशेष झाली असावी, असे अनुमान होते. तथापि अचानक या सापाचे दर्शन झाले पण मृतावस्थेत झाल्याने संशोधकांना आणि प्राणीप्रेमींना हळहळ वाटली. म्हणून त्यांनी मृत्यूच्या कारणांचे संशोधन करण्यास प्रारंभ केला.

सापाची तपासणी करता त्याच्या तोंडात एक मोठा शतपाद प्राणी (सेंटीपेड) सापडला. वास्तविक साप अशा प्राण्यांचे भक्ष्य नेहमीच करतो पण ते करीत असताना सापच मरणे ही दुर्मिळ घटना असते. मुख्य म्हणजे हा शतपाद प्राणी सापाच्या तोंडातही जीवंत होता. त्याला संशोधकांनी सापाच्या तोंडातून बाहेर काढून जीवंत ठेवले. पण सापाचे प्राण मात्र वाचले नाहीत. हे साप रिमरॉक स्नेक्स या नावाने ओळखले जातात. ते केवळ 6 ते 11 इंच लांबीचे असतात. पण त्यांचे विष 100 माणसे मरतील इतके जहाल असते. असा साप मरणे ही एक प्रकारे निसर्गाची फार मोठी हानी मानली जाते. असा साप त्याचे भक्ष्य गिळताना मारला जावा आणि भक्ष्य मात्र जीवंत रहावे या अद्भूत घटनेचे विश्लेषण आता संशोधकांकडून केले जात आहे. अर्थात या प्रमाणे माणसांच्या संदर्भातही मृत्यू आपल्या हाती नसतो तसेच अन्य प्राण्यांबाबतही असणार यात शंका नाही.

Related Stories

पाकिस्तानची संसद विसर्जित

Patil_p

Afghanistan crisis : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत महत्वाचा ठराव मंजूर

Archana Banage

चीनमध्ये मिळाला नवा विषाणू

Patil_p

चीनचा दूतावास बंद करण्याचा आदेश

Patil_p

नाक झाकेल, पण कोरोनासह अनेक रोगांशी लढणार !

Patil_p

स्पुतनिक-5 अन् कोविशिल्डचे संयुक्त परीक्षण

Patil_p