360 डिग्रीत चौफेर फटकेबाजीची क्षमता असलेल्या सूर्यकुमार यादवने यंदा वर्षभरात प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर एककलमी वर्चस्व गाजवत आपल्या गुणवत्तेची उत्तम चुणूक दाखवून दिली आहे. यंदाच्या आशिया चषकात या दिग्गज फलंदाजाकडून आणखी अपेक्षा असतीलच. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो फलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ असणार आहे. ‘सूर्य’ असाच तळपत राहावा, हीच तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींची मनापासून इच्छा असेल. घोडामैदान जवळच आहे!
भारतीय फलंदाजांचे 2022 मधील टी-20 प्रदर्शन
फलंदाज / डाव / धावा / सर्वोच्च / सरासरी / स्ट्राईक रेट / शतक / अर्धशतक
सूर्यकुमार यादव / 14 / 514 / 117 / 42.83 / 190.37 / 1 / 3
दीपक हुडा / 7 / 274 / 104 / 54.80 / 161.17 / 1 / 0
हार्दिक पंडय़ा / 13 / 314 / 51 / 34.88 / 144.03 / 0 / 1
श्रेयस अय्यर / 14 / 449 / 74 ना. / 44.90 / 142.99 / 0 / 4
रविंद्र जडेजा / 8 / 201 / 46 ना. / 50.25 / 141.54 / 0 / 0
रोहित शर्मा / 15 / 323 / 64 / 23.07 / 135.71 / 0 / 1
रिषभ पंत / 13 / 260 / 52 ना. / 26.00 / 135.41 / 0 / 1
विराट कोहली / 6 / 175 / 59 ना. / 35.00 / 124.11 / 0 / 2.
कोट्स
विराट कोहलीकडून माझ्या खेळाला इतकी दाद मिळेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती. सामना संपल्यानंतर विराट माझ्या मागून का चालत आहे, हे देखील मला प्रारंभी कळालेच नाही. खेळपट्टीची अनुकूल साथ मिळत असल्याने मी त्या डावात आक्रमकतेवर अधिक भर दिला आणि त्यात मला यशही मिळत गेले होते.
-भारताचा मध्यफळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव
2022 मध्ये 500 पेक्षा अधिक धावा जमवणाऱया फलंदाजांचे स्ट्राईकरेट
फलंदाज / देश / सामने / स्ट्राईक रेट
दिपेंद्र सिंह पेरी / नेपाळ / 18 / 136.68
सबावून डेव्हिजिक / झेक / 146.41
निकोलस पूरन / विंडीज / 18 / 135.20
सिकंदर रझा / झिम्बाब्वे / 16 / 152.21
सूर्यकुमार यादव / भारत / 14 / 190.37
यंदा प्रत्येक चेंडूवर किमान 2 धावा जमवतोय एसकेवाय!
हाँगकाँगविरुद्ध 26 चेंडूत 68 धावांची जोरदार खेळी साकारणारा सूर्यकुमार यादव या वर्षभरात उत्तम बहरात असून तो प्रत्येक चेंडूवर सरासरी किमान 2 धावा जमवत आला असल्याचे आकडेवारी सांगते. सध्या टी-20 क्रिकेटमध्ये या वर्षात भारतीय संघातर्फे सर्वाधिक धावा देखील सूर्यकुमारच्या खात्यावरच नोंद आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक सामनावीर पुरस्कार
सामनावीर पुरस्कार / खेळाडू
12 / विराट कोहली
11 / रोहित शर्मा
7 / युवराज सिंग
5 / सूर्यकुमार यादव
5 / यजुवेंद्र चहल.
अलीकडील सामन्यात सूर्यकुमारचे योगदान
तारीख / धावा / प्रतिस्पर्धी / ठिकाण / स्ट्राईकरेट
7 जुलै / 39 / इंग्लंड / साऊदम्प्टन / 205.26
9 जुलै / 15 / इंग्लंड / बर्मिंगहम / 136.36
10 जुलै / 117 / इंग्लंड / नॉटिंगहॅम / 212.72
29 जुलै / 24 / विंडीज / तारौबा / 150.00
1 ऑगस्ट / 11 / विंडीज / बॅसेटेरे / 183.33
2 ऑगस्ट / 76 / विंडीज / बॅसेटेरे / 172.72
6 ऑगस्ट / 24 / विंडीज / लॉडरहिल / 171.42
28 ऑगस्ट / 18 / पाकिस्तान / दुबई / 100.00
31 ऑगस्ट / 68 ना. / हाँगकाँग / दुबई /261.53.