तरुण भारत

संजय राऊत माझे 25 लाख कधी परत करणार?

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात रंगलेल्या वादात आता भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांनी उडी घेतली आहे. कंबोज यांनी ट्विट करत संजय राऊत यांना माझे 25 लाख परत कधी करणार? असा प्रश्न विचारला आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझे पैसे परत मिळवण्यासाठी मदत करावी असा टोलाही लगावला आहे.

Advertisements

संजय राऊत यांनी सोमय्यांविरोधात आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे. दोन दिवसापूर्वीच राऊतांनी ‘किरीट का कमाल’ असं टि्वट करीत सोमय्यांवर हल्लाबोल केला होता. त्याला कंबोज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” ‘किरीट का कमाल’ असे म्हणणारे संजय राऊत यांनी माझ्याकडून 2014 मध्ये रॉयल मराठा इंटरटेन्मेंट नावावर 25 लाख रुपये घेतले होते. हे पैसे व्याजाने परत करू असं संजय राऊत यांनी सांगितले होते. आता माझे पैसे मला परत करा. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे माझे पैसे परत मिळवण्यासाठी मदत करा.” कंबोज यांनी या ट्विटसोबत याबाबतचा स्क्रिनशॉट्सही शेअर केला आहे.

Related Stories

धोका वाढला : महाराष्ट्रातील वटवाघूळांमध्ये आढळला ‘निपाह’ विषाणू

Rohan_P

जिल्हय़ात भूकंपाचा सौम्य धक्का

Patil_p

… तर मी सुशांतच्या कुटुंबीयांची माफी मागेन : संजय राऊत

Rohan_P

किरणी मालांच्या दुकानांच्या वेळेबाबत अफवा

Patil_p

देशात 86,498 नवे बाधित, 2123 मृत्यू

datta jadhav

पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी पंतप्रधान व्हॅटिकन सिटीमध्ये

Abhijeet Shinde
error: Content is protected !!