क्रीनवरील माहिती चुकीची, प्रवाशांतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण झाले. परंतु प्रवाशांना येणाऱ्या समस्या काही कमी झालेल्या नाहीत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर दाखल होण्यापूर्वी क्रीनवर डब्यांची माहिती दिली जाते. परंतु दाखविलेल्या माहितीप्रमाणे त्या-त्या ठिकाणी हे डबे येत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे अनेकांना प्रवासाविना माघारी फिरावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
रेल्वेस्थानकावर अनेक जलदगतीच्या एक्स्प्रेस दाखल होतात. अवघे एक ते दीड मिनिट थांबल्यानंतर त्या पुढच्या मार्गाला निघतात. इतक्या कमी वेळेत प्रवाशांना तारेवरची कसरत करत डब्यामध्ये प्रवेश करावा लागतो. परंतु बऱ्याचवेळा क्रीनवर डब्यांचा दिलेला अनुक्रम व प्रत्यक्षात डब्यांची रचना यामध्ये तफावत जाणवते. त्यामुळे शेवटच्या क्षणात प्रवाशांना जीव मुठीत घेऊन धावत, पळत डब्यात प्रवेश करावा लागतो.
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण झाले. मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणी क्रीन बोर्डही नव्हते. आता क्रीन बोर्ड लावण्यात आले असले तरी रेल्वेच्या रचनेप्रमाणे डब्यांची माहिती दिल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. मागील आठवड्यात दोनवेळा असा प्रकार घडल्याने प्रवाशांनी ‘तरुण भारत’कडे नाराजी व्यक्त केली. बुकिंग करूनही रेल्वेच्या चुकीमुळे प्रवाशांना फटका बसला. त्यामुळे यापुढील काळात रेल्वेच्या रचनेप्रमाणेच डब्यांची माहिती द्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.