संतत्प गोवा डेअरी संलग्न दुध उत्पादकांचा सवाल
प्रतिनिधी/ फोंडा
बैलपोळा म्हणजेच दिवाळीचा पाडवा सण दोन दिवसावर येऊन ठेपलाय तरी गोवा डेअरी संलग्न दुध उत्पादकांना दुधाचे पैसे खात्यात जमा न झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात महगांईची झळ सोसणाऱया दुध उत्पादकांना गोवा डेअरीने जबरदस्त झटका दिला आहे. दुध संकलनाचे पैसे सोसायटय़ांना वितरीत न केल्याने सद्या दुध उत्पादक दिवाळी, पाडव्याच्या सणावर विरजण पडलेले आहे. याबाबत गोवा डेअरीनेही कोणतेही स्पष्ट कारण न दिल्याने दुध उत्पादक हवालदील झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार सद्या गोवा डेअरीवर दुध उत्पादकांचे हित जपणारे संचालक मंडळ कार्यरत आहे. तरीही अशी परिस्थिती ओढाल्यामुळे दुध उत्पादकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रशासकाच्या कार्यकाळात जर असा प्रकार घडला असता तर दुध उत्पदाकावर सरकारने अन्याय केला असा कांगवा याच संचालकांनी केला असता अशी माहिती दुध उत्पादकांनी दिली. गोवा डेअरीने संलग्न सुमारे 176 सोसायटय़ांना दुधाचे पैसे खात्यात जमा न केल्याने अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. काही दुध सोसायटय़ांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. अशा सोसाय़टय़ांनी आपल्या रिजर्व्ह फंडमधून दुध उत्पादकांना दुधाचे पैसे वितरीत केलेले आहे. मात्र काही कमकुवत असलेल्या सोसायटय़ांनी ते शक्य नसल्याने दुध उत्पादक ऐन सणासुदीच्या काळात मोठा झटका गोवा डेअरीने दिला आहे.
डेअरीच्या कथित घोटाळाप्रकरणी संशयित असलेल्या मुख्य लेखपालांना ऑडीटच्या कामकाजात सामावून घेतले होते. याप्रकरणी आमसभेत विरोध झाल्यानंतर त्याना वगळले की त्याच हुद्दावर त्या तळ ठोकून कामकाज सुरू आहे? याबाबतही डेअरीच्या संचालक मंडळाने कोणती भूमिका घेतली? याबाबत शेतकऱयाना कोणतीच माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही. शेतकऱयांचे दुधाचे पैसे अडकण्यामागे नेमके काणते कारण हे मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी डेअरीचे अध्यक्षांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.