नवी दिल्ली
काम कोणतेही असो, ते केव्हाही लहान किंवा मोठे नसते. असाच अनुभव एका कंपनीच्या सीईआंच्या वर्तनामधून दिसून आला आहे. यामध्ये झोमॅटो कंपनीच्या एक वर्षाच्या दरम्यान झोमॅटोवर फूड (अन्न) ऑर्डर्समध्ये मोठी वाढ राहिली आहे. यावेळी कंपनीची धुरा सांभाळणारे झॉमेटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी स्वतःहून अन्न डिलिव्हरी करण्यासाठी गेले आणि त्याची माहितीही स्वतः गोयल यांनी ट्विट करत दिली आहे.
पार्टीमध्ये दंग असलेल्या ग्राहकांपर्यंत स्वतः झोमॅटोचे जॅकेट घालून झोमॅटोच्या सीईओंनी ऑर्डर पोहोच केली. यावेळी आलेल्या अनुभवाचे कथन स्वतः गोयल यांनी पेले आहे.
नव्या विक्रमाची नोंद
फूड डिलिवरी करणारे ऍप झोमॅटो यांनी नवीन वर्षात आपल्या नावावर विक्रम नोंद दवला आहे. कंपनीने 31 डिसेंबर रोजी तब्बल 20 लाखापेक्षा अधिकची ऑर्डर डिलिव्हरी केली आहे. सदरची ऑर्डर ही मागील 3 वर्षांतील एकूण ऑर्डरच्या बरोबरीत राहिल्याचेही स्पष्ट केले आहे.