Tarun Bharat

शिंदें गटाच्या मेळाव्यासाठी झालेल्या खर्चाच्या चौकशीसाठी कोर्टात याचिका दाखल

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाने ग्रामीण भागातून आणण्याकरिता वापरण्यात आलेल्या परिवहन महामंडळाच्या बसेसवर १० कोटी रुपयाची रक्कम देण्यात आली होती. या अज्ञात व्यक्तीविरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि आयकर कायद्यानुसार कलम ६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी याचिका करण्यात आली आहे. (Petition in HC against CM Dussehra Melawa )

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांचा स्त्रोत काय आहे?, अशी विचारणा या याचिकेत करण्यात आली असून त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी शिंदे गटानं मेळाव्यासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये कुठून आले?, त्याचा स्त्रोत काय आहे?, हे पैसे कुणी दिले? आणि एसटी महामंडळाच्या १८०० बसेस आरक्षित कशा करण्यात आल्या?, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळं या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी याचिकाकर्ते जगदेव यांनी केली आहे.

हे ही वाचा : औरंगाबाद डंपर-खासगी बसच्या अपघातात डोळ्यादेखत माणसांचा झाला कोळसा,प्रत्यक्षदर्शीनी सांगितला घटनाक्रम

शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी निर्माणाधीन असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर केला होता. या मार्गाचं काम अजून अपूर्ण असताना त्याचा वापर का गेला गेला?, यात वाहतुकीच्या नियमांचं पालन तर झालं नसल्यानं त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

पक्षाची नोंदणी नसतानाग दहा कोटी कुठून आले?
शिंदे गटाची राजकीय पक्ष म्हणून अद्यापही नोंदणी झालेली नाही. मग त्यांनी समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी १० कोटी रुपये कुठून आणले?, या प्रकरणात मोठा घोटाळा झाला असून याची सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्ते दीपक जगदेव यांनी केली आहे. त्यामुळं आता शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Related Stories

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन

Archana Banage

खाद्यतेल होणार स्वस्त; केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय

Archana Banage

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला जामीन नाहीच, आता सुनावणी २० ऑगस्टला

Archana Banage

ही कोणत्या प्रकारची साध्वी?…स्वाध्वी प्रज्ञाच्या वक्तव्यावर कन्हैया कुमारचा सवाल Thakur

Archana Banage

कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटाने उचलले

Patil_p

”गुहागर विजापूर, आणि मनमाड चिकोडी राष्ट्रीय महामार्गगतीने पूर्ण करा”

Archana Banage