कॉम्रेड प्राध्यापक आनंद मेणसे यांनी व्यक्त केले मत
जिथे जिथे फॅसीझम आला आणि संघर्ष झाला तेथे फॅसिझमचा पराभव झाला हा जगातील इतिहास आहे फॅसिस्ट हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवलदारांभांडवलदारांशी युती करताना दिसतात जगभरात फॅसीझम सत्तेवर आले परंतु अंतिम लढाईत त्यांचा पराभव झालेला दिसतो कारण जन्माला आलेला प्रत्येक माणूस हात पाय मेंदू घेऊन जन्माला आला असतो त्याच्याकडे विचार करण्याची वृत्ती असते त्याला रोजगार हवा असतो त्यामुळे तो पॅसिझमच्या विरोधात उभा राहतो असे मत बेळगाव येथील कॉम्रेड प्राध्यापक आनंद मिणसे यांनी येथे व्यक्त केले. येथील श्रीराम वाचन मंदिर तर्फे सोमवारपासून देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून प्राध्यापक मेणसे यांनी पहिले पुष्प गुंपले त्यांचा त फॅसिझमचे जागतिक संकट हा व्याख्यानाचा विषय होता .
व्याख्यानमालेचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार होते परंतु ते आले नसल्यामुळे मेंणसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले .यावेळी व्यासपीठावर श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष एडवोकेट संदीप निंबाळकर ,कार्यवाह रमेश बोंद्रे, सदस्य प्राध्यापक जी ए. बुवा , प्राध्यापक प्रवीण बांदेकर , राजेश मोडकर आदी उपस्थित होते अध्यक्षस्थानी डॉक्टर श्रीकांत सावंत उपस्थित होते .
सावंतवाडी / प्रतिनिधी